नवी दिल्ली 09 एप्रिल : गेल्या दोन दशकांमध्ये जंगलातील आगीच्या घटनांमध्ये आणि त्यांच्या तीव्रतेमध्ये 10 पट वाढ झाली असून ही चिंताजनक बाब आहे. रिसर्च इन्स्टिट्यूट कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) च्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे. एकीकडे देशातील अनेक भागांत उष्मा झपाट्याने वाढत असताना जंगलातील आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशा स्थितीत हा अहवाल धक्कादायक आहे. 2 दशकात 10 पट वाढ वातावरणातील बदलामुळे जगभर जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. भारतातही गेल्या दोन दशकांमध्ये जंगलातील आगीच्या घटना आणि तीव्रतेत वाढ झाली आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने (सीईईडब्ल्यू) गुरुवारी एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की जंगलातील आगीची वारंवारता आणि तीव्रता तसेच गेल्या दोन दशकांमध्ये अशा आगींच्या कालावधीमध्येही (महिन्यांत) वाढ झाली आहे. मार्चमध्येच अशा अनेक घटना घडल्या ‘मॅनेजिंग फॉरेस्ट फायर इन ए चेंजिंग क्लाइमेट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये जंगलातील आगीत 10 पट वाढ झाली आहे. भारतातील 62 टक्क्यांहून अधिक जंगल भागात अति तीव्रतेच्या आगी लागल्या आहेत. या CEEW अहवालानुसार, गेल्या मार्च महिन्यात उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये जंगलातील आगीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. उष्णता हे एक मोठं कारण राजस्थानच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पात नुकतीच लागलेली आग देखील मोसमी मानली जात होती, अतिशय उच्च तापमानामुळे आगीचा प्रसार वाढत होता. CEEW चे अविनाश मोहंती यांनी अहवालात म्हटले आहे की, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील हवामानात झपाट्याने बदल झाल्यामुळे उच्च तीव्रतेच्या जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अहवालानुसार, भारतातील 30 टक्क्यांहून अधिक जिल्हे जंगलातील भीषण आगीमुळे असुरक्षित आहेत, ही चिंतेची बाब आहे. यंदाही देशातील अनेक भागात उष्णतेने सर्व विक्रम मोडीत काढले असून, अशा परिस्थितीत जंगलांना आग लागण्याच्या घटना आणखी वाढू शकतात. हे वाचा - भारताची नवीन वाहतूक प्रणाली! डोंगर-दऱ्यांमध्ये हवेतून जाताना दिसतील केबल कार या राज्यांमध्ये आहेत सर्वाधिक जंगलं भारत हा खूप मोठा देश आहे आणि इथल्या अनेक हवामान घटना स्थानिक प्रभावामुळे होत आहेत. पण, गेल्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ज्याप्रकारे तापमानाने हिमाचल प्रदेश, विदर्भ, गुजरात, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील विक्रम मोडीत काढले आहेत. ही चिंतेची बाब आहे, कारण बहुतांश जंगले या राज्यांमध्ये आहेत. मार्च महिन्यातच आग अधिक भडकू लागली सरिस्का फॉरेस्ट रिझर्व्हमध्ये नुकतीच घडलेली घटना त्या आठवड्यातील चौथी जंगली आगीची घटना होती. पूर्वी, उन्हाळ्याच्या महिन्यांत, म्हणजे मे ते जून दरम्यान जंगलात आग लागायची. आता वसंत ऋतूमध्ये, मार्च ते मे दरम्यान, हवामान बदलामुळे, आपण जंगलात आग लागण्याच्या अनेक घटना पाहत आहोत. हे वाचा - ‘आमच्यामधलं प्रेम आजही जिवंत,’ तिनं पतीनिधनानंतर 11 महिन्यांनी दिला बाळाला जन्म 75 हून अधिक जिल्हे हॉटस्पॉट बनले आहेत फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या 2019 च्या अहवालानुसार, भारतातील 36 टक्के वनक्षेत्र हे जंगलातील आगीमुळे प्रभावित झालेल्या भागात येते. CEEW अभ्यासानुसार, 75 टक्क्यांहून अधिक भारतीय जिल्हे आगीच्या घटनांसाठी हॉटस्पॉट आहेत. तर 30 टक्क्यांहून अधिक जिल्हे जंगलातील आगीचे हॉटस्पॉट आहेत. आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जंगलात आग लागण्याचा सर्वाधिक धोका असल्याचेही या अभ्यासात आढळून आले आहे. अभ्यासानुसार, मिझोराममध्ये गेल्या दोन दशकांमध्ये जंगलातील आगीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत CEEW ने राज्ये आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे की, जर हवामान बदलाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर अलर्ट जारी केला नाही, तर भारतातील जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.