मनमोहन सिंगांपासून काही तरी शिका, निर्मला सितारमन यांच्या पतींचा मोदींना सल्ला!

मनमोहन सिंगांपासून काही तरी शिका, निर्मला सितारमन यांच्या पतींचा मोदींना सल्ला!

अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी काहीही ठोस उपायोजना नसल्यानेच मोदी सरकारने निवडणुकीत राष्ट्रवादाचा विषयच उपस्थित केला.

  • Share this:

नवी दिल्ली 14 ऑक्टोंबर : देशाची अर्थव्यवस्था सुस्तावलेली असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशभर फिरून तज्ज्ञांना भेटत आहेत. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत असल्याचं त्या वारंवार सांगत आहेत. असं असतानाच सितारामन यांचे पती आणि अर्थ-राजकीय स्तंभलेखक पराकला प्रभाकर यांनी एक लेख लिहून सरकारला खडे बोल सुनावलेत. अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे हे मान्य करा आणि केवळ नेहरूंवर टीका करण्याचे सोडून मनमोहन सिंग आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी ज्या आर्थिक सुधारणा राबवल्या त्यापासून धडा घ्या, काहीतरी शिका असा सल्ला त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला दिलाय. प्रभाकर यांचा हा सल्ला मोदी सरकारला चपराक मानला जातो.

मी सोन्याची कोंबडी, मला कापू नका; काँग्रेस उमेदवाराचं मतदारांना प्रलोभन

प्रभाकर हे आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार राहिलेले आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात त्यांनी सरकारला चार गोष्टी सुनावल्या आहेत. ते लिहितात, देशात गेल्या 45 वर्षातलं सर्वात मोठं बेरोजगारीचं संकट निर्माण झालंय. जीडीपीमध्ये घट झालीय. उद्योगाचा विकास मंदावलाय. सर्वच क्षेत्रात मरगळ आली आहे. असं असतानाही सरकार काही ठोस उपाय योजना करताना दिसत नाही.

'मूंछ नहीं, तो कुछ नहीं' निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांच 'मिशी'वरून भांडण

सरकारकडे उत्तम सल्ला देणारे अर्थतज्ज्ञ नाहीत असं दिसतंय असं मतही त्यांनी नोंदवलंय.ते पुढे म्हणतात,  नरसिंहराव पंतप्रधान असताना मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांनी अतिशय धडाक्यात आर्थिक सुधारणा राबवल्या आणि देशाची अर्थव्यवस्था रूळावर आली. त्यापासून मोदी सरकारने काही शिकायला पाहिजे. फक्त नेहरूंच्या समाजवादी धोरणांवर टीका करून काहीही साध्य होणार नाही.

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी काहीही ठोस उपायोजना नसल्यानेच मोदी सरकारने निवडणुकीत आर्थिक मुद्यांचा विषयच उपस्थित केला नाही. उलट सुरक्षा, राष्ट्रवाद, काश्मीर, पाकिस्तान हे भावनिक विषय उपस्थित केले असंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 14, 2019, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading