मी सोन्याची कोंबडी, मला कापू नका; काँग्रेस उमेदवाराचं मतदारांना प्रलोभन

मी सोन्याची कोंबडी, मला कापू नका; काँग्रेस उमेदवाराचं मतदारांना प्रलोभन

कोंबडी कापली तर काय होणार? तर कोंबडी मरून जाईल आणि काहीच मिळणार नाही. मी तुम्हाला सतत देतच राहील.

  • Share this:

रवी शिंदे,  भिवंडी 14 ऑक्टोंबर : निवडणुकीच्या प्रचारात वाट्टेल ते प्रलोभन देऊन आणि प्रचार करून मतांचा जोगवा मागितला जातो. भिवंडीचे काँग्रेसचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी मतदारांना भुरळ घालण्यासाठी चक्क स्वत:ला सोन्याच्या कोंबडीची उपमा दिली. संतोष शेट्टी हे निवडणुकीच्या आधीपर्यंत भिवंडी भाजपचे शहराध्यक्ष होते. त्यांनी बंडखोरी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारीही मिळवली. कालपर्यंत भाजपचे असलेले नेते आता काँग्रेसमध्ये जाऊन निवडणूक लढवित असल्याने त्यांना मतदारांना आपली भूमिका पटविताना खूप कसरत करावी लागतेय.

'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

एक प्रचार सभेत ते म्हणाले, मी सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे मला कापू नका, मी तुम्हाला अंडे देत जाईल...सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय. काँग्रेसचे उमेदवार संतोष शेट्टी 2014 मध्ये भाजप मधून भिवंडी पूर्व मधून लढले असताना शिवसेनेचे उमेदवार आमदार रुपेश म्हात्रे यांनी फक्त 3 हजार मताने शेट्टी यांचा पराभव केला होता मात्र आता काँग्रेसचे शेट्टी आणि शिवसेनेचे आमदार म्हात्रे यांच्यात भिवंडी पूर्व मधून  खरी लढाई होणार आहे.

'10 रुपयात थाळी देण्यापेक्षा...'; भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला!

ते पुढे म्हणाले, कोंबडी कापली तर काय होणार? तर कोंबडी मरून जाईल आणि काहीच मिळणार नाही. मात्र असं करू नका कारण त्यामुळे काहीच मिळणार नाही. मी तुम्हाला सतत देतच राहील त्यामुळे न विसरता तुम्ही मलाच मत द्या.

पुणे जिल्ह्यात 'मिशी'वरून प्रचार

निवडणुकीच्या प्रचारात कधी कुठला विषय होईल ते काही सांगता येत नाही. खरंतर 'मिशी' हा प्रचाराचा विषय होईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं. पण पुणे जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात 'मिशी' हा प्रचाराचा विषय झालीय आणि त्यात बडे नेतेही उतरले आहेत. या मिशीने निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आणलीय आणि ती सोशल मीडियावरही ट्रोल सुद्धा होतेय. पुणे जिल्ह्याच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातला हा प्रकार निवडणूक लढवणाऱ्या  आजी-माजी आमदारांमध्ये विकासकामांवर बोलण्यापेक्षा एकमेकांच्या मिशा कशा चांगल्या आहेत हे पटवण्यातच वेळ जातोय. आणि आता तर या दोघांच्यात अपक्ष उमेदवार आणि या या दोनही उमेदवारांच्या वरिष्ठ नेत्यांनीही उडी घेतलीये त्यामुळे सभांमध्ये उपस्थित मतदारांची चांगलीच करमणूक होताना दिसत आहे.

VIDEO : दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा, खिचडीवरुन सोनिया गांधींना लगावला टोला

खेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा जाहीर सभेत शिवसेनेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्या नसलेल्या मिशांना टार्गेट केले.'मूंछ नहीं, तो कुछ नहीं'(सुरेश गोरे नेहमी क्लीन शेव्ह मध्ये असतात. मिशी कधीही ठेवत नाहीत) असं ते विधान  होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच ट्रोल झाला.

First published: October 14, 2019, 3:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading