रायचंद शिंदे, खेड 14 ऑक्टोंबर : निवडणुकीच्या प्रचारात कधी कुठला विषय होईल ते काही सांगता येत नाही. खरंतर ‘मिशी’ हा प्रचाराचा विषय होईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं. पण पुणे जिल्ह्यातल्या एका मतदारसंघात ‘मिशी’ हा प्रचाराचा विषय झालीय आणि त्यात बडे नेतेही उतरले आहेत. या मिशीने निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आणलीय आणि ती सोशल मीडियावरही ट्रोल सुद्धा होतेय. पुणे जिल्ह्याच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातला हा प्रकार निवडणूक लढवणाऱ्या आजी-माजी आमदारांमध्ये विकासकामांवर बोलण्यापेक्षा एकमेकांच्या मिशा कशा चांगल्या आहेत हे पटवण्यातच वेळ जातोय. आणि आता तर या दोघांच्यात अपक्ष उमेदवार आणि या या दोनही उमेदवारांच्या वरिष्ठ नेत्यांनीही उडी घेतलीये त्यामुळे सभांमध्ये उपस्थित मतदारांची चांगलीच करमणूक होताना दिसत आहे. VIDEO : दानवेंनी सांगितला भन्नाट किस्सा, खिचडीवरुन सोनिया गांधींना लगावला टोला खेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा जाहीर सभेत शिवसेनेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्या नसलेल्या मिशांना टार्गेट केले.‘मूंछ नहीं, तो कुछ नहीं’(सुरेश गोरे नेहमी क्लीन शेव्ह मध्ये असतात. मिशी कधीही ठेवत नाहीत) असं ते विधान होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच ट्रोल झाला ‘निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?’ नितेश राणे म्हणाले… मोहित्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनीही चांगलीच तयारी केली. दिलीप मोहिते पाटील यांना निशाणा करत हातवारे करत तेही म्हणाले “मग तुम्हाला ‘मूंछ नहीं, तो कुछ नहीं’ ना. उपहासाने त्यांनी हे विधान वापरत वयक्तिक टीका केली होती. आजी-माजी आमदारांच्या या ट्रोल मुळे आणि मिशी मुळे हे दोघे चर्चेत राहिल्यावर भाजपचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख तरी मागे कशे बरे राहतील, त्यांनीही मग या दोघांपेक्षा आपलीच मिशी कशी श्रेष्ठ हे सांगायला सुरवात केलीये. मतदानाच्या तोंडावर भाजपला धक्का, मोठ्या नेत्याने दिला राष्ट्रवादीला पाठिंबा! मग आता या महत्वाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे अध्यक्षही उतरलेत. नुकत्याच झालेल्या चाकण आणि राजगुरूनगरच्या सभांमध्ये राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही आपापल्या नेत्यांची बाजू सावरली आणि विकासापेक्षा मिशी वरच टीका टिपण्णी करत उपस्थितांचं मनोरंजन केलं. खरं तर खेड-आळंदी हा मतदार संघ तुकारामांच्या देहू आणि माउलींच्या आळंदी मुळे देशभरात ओळखला जातो पण आता इथल्या आजी माजी आमदारांच्या मिशीमुळेही तो ओळखळा जातो की काय असं वाटायला लागलाय. कारण निवडणुका आल्या की अशा खालच्या टीका टिपण्या होतच राहणार हे मात्र नक्की. आता यात कोणती मिशी निवडणुकीत भाव खाणार हे मात्र 24 ऑक्टोबरला कळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







