नवी दिल्ली, 29 मार्च : देशभरातील प्रत्येक नागरिक आज कोरोनासारख्या (Coronavirus) महाभयंकर आजारापासून लढतो आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाऊन (Lockdown) घोषित केलं आहे. यामध्ये वैद्यकीय मदतीसाठी लाखो हात पुढे आले आहे. कवी विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे. आज देशातील कानाकोपऱ्यातून श्रीमंतापासून अगदी गरीबांपर्यंत लोक एकमेकांना मदत करीत आहेत.
There’s nothing big or little.
— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
Every single contribution matters. It shows our collective resolve to defeat COVID-19. #IndiaFightsCorona https://t.co/ibCnvGNIyo
यादरम्यान रुग्णांचा वाढता आकडा पाहता पंतप्रधानांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे. ही सर्व मदत पीएम केअर्स (PM Cares) येथे करण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये सयीद अतार रेहमान या व्यक्तींनी पीएम केअर्सला 501 रुपयांचा दान दिलं आहे. आणि ही माझ्याकडून छोटीशी मदत असंही लिहिलं आहे. पीएम केअर्सने या नागरिकाच्या दानाची रिसिप्ट शेअर केली आहे. यावर नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले; ‘ काही लहान-मोठं नसतं. प्रत्येक व्यक्तीचा छोटासा सहयोगही महत्त्वाचा आहे. यावरुन आपण एकजूटपणे कोविड – 19 शी मुकाबला करीत असल्याचे दिसते’ संबंधित - मुस्लिमांनी ‘राम नाम’ जप करीत केला अंत्यसंस्कार, दु:खात माणुसकी धावून आली मोदींनी मदतीचं आवाहन केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार यांनी 25 कोटी रुपयांचं दान दिलं. त्यानंतर अनेक उद्योगपतींबरोबरच अभिनेते, खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा रुग्णांची संख्या 1000 च्या वर गेली आहे तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित - ‘मी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं’, मजुराच्या माथ्यावर लिहीत पोलिसाने दिली शिक्षा