नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) व्हायरचा विळखा संपूर्ण देशभरात पसरला आहे. कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगितले जात आहे. यादरम्यान नागरिकांना केवळ घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या संकटात एका कुटुंबावर दुहेरी संकट आलं. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी भीतीने अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. मात्र अशा कठीण परिस्थितीत मुस्लीम बांधवांनी पुढे येत अंत्यसंस्कार केला. संबंधित - उद्धव ठाकरेंचा शिलेदार! आईचा दशक्रिया विधी न करताच विकास खारगे मंत्रालयात हजर बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईकांनी त्यांच्या घरी येणं टाळलं. मात्र याचवेळी शेजारील मुस्लीम बांधव त्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले. व रविशंकर यांचे शव आपल्या पाठीवर घेऊन त्यांना स्मशानभूमीत घेऊन गेले. इतकचं नव्हे तर शव पाठीवर घेतल्यानंतर ते ‘राम नाम सत्य है’ म्हणत होते. काँग्रेस ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेच भारताचं स्पिरीट आहे. हिच भारताची संकल्पना आहे, असं म्हणत त्यांनी देशाची एकता दाखवून दिली; अशी प्रतिक्रिया शशी थरुर यांनी दिली आहे.
The true Soul & spirit of India. This is the #IdeaofIndia we are pledged to preserve, protect & defend. https://t.co/8Bhi4wm6HD
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 29, 2020
कठीण समयी जो मदतीसाठी धावून येतो तोच खरा मित्र असं म्हटलं जात. या उदाहरणावरुन हेच दिसून येत की आपण एकत्र आहोत. जेव्हा आपल्या देशावर संकट येतं तेव्हा आम्ही धर्म-जात विसरुन एकमेकांच्या मागे उभे राहतो.