भोपाळ, 29 मार्च : केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊनचं (Lockdown) उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना बांबूचे फटके दिले जात आहे, तर काहींना भररस्त्यात उठा-बशा काढायला सांगितल्या जात आहे. पोलिसांकडून विविध पद्धतीने लोकांवर निर्बंध आणायचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहे. यातच एका महिला पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकाला दिलेल्या शिक्षेमुळे तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस महिलेने कारवाई करीत एका मजुराच्या कपाळावर लिहिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ही महिला मजुराच्या कपाळावर लिहित असतानाचा एका फोटो समोर आला आहे. संबंधित - राज मला दिलासा आणि सूचनाही देतोय, उद्धव ठाकरेंनी केला खुलासा मजुराच्या माथ्यावर लिहिले आहे की, ‘मी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आहे. माझ्यापासून लांब राहा.’ मात्र यानंतर आता महिला पोलिसाविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू झाली आहे.
Madhya Pradesh: A Police Sub-Inspector writes 'I have violated lockdown, stay away from me' on forehead of a labourer in Gorihar area of Chhatarpur. SP Kumar Saurabh says, "This is unacceptable. Action is being taken against the police woman as per the law". #CoronavirusLockdown pic.twitter.com/bf6IizgPjD
— ANI (@ANI) March 29, 2020
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू आहे. अनेक देशांनी कोरोनाचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून याव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास निर्बंध आहेत. संबंधित - आपल्या भाकरीतील अर्धी भाकरी गरजूंना, शेतकऱ्याने मजुरांना वाटले शेतातील गहू