पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या, वाचा रुग्णांची लेटेस्ट आकडेवारी

पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या, वाचा रुग्णांची लेटेस्ट आकडेवारी

देशात गेल्या 24 तासात 22 हजार 752 नवीन प्रकरणं नोंदवली गेली तर, 482 लोकांचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जुलै : देशात नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासात 22 हजार 752 नवीन प्रकरणं नोंदवली गेली तर, 482 लोकांचा मृत्यू झाला. याहस भारतातील कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाख 42 हजार 417 झाली आहे. तर, आतापर्यंत 4 लाख 56 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 20 हजार 20 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्य म्हणजे देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा 61.53% तर, सकारात्मकता दर 8.66%आहे. भारतासाठी ही चांगली बाब आहे. मुख्य म्हणजे गेल्या 24 तासांत देशात 2.62 कोरोना चाचण्या झाल्या. पहिल्यांदाच हा आकडा 2.5 हून जास्त आहे.

वाचा-अभिमानास्पद! एका शेतकऱ्याचा मुलगा तयार करतोय पहिली मेड इन इंडिया लस

देशातील 7 राज्यांमध्ये एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा जास्त आहे. अशीच काहीशी परिस्थिती तामिळनाडूमध्येही आहे. तामिळनाडूचा रिकव्हरी रेट हा 60% आहे.

वाचा-कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया

राज्यांची आकडेवारी

वाचा-हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी देसात 2 लाख 62 हजार 679 लोकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 लोकांची चाचणी झाली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 8, 2020, 10:10 AM IST

ताज्या बातम्या