Home /News /videsh /

Bubonic plague: कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया

Bubonic plague: कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया

Bubonic plague: उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    बीजिंग, 08 जुलै : कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात. या आजाराचे नाव ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague) आहे. उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच ब्यूबॉनिक प्लेगवर प्रतिक्रिया दिली आहे. हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडतात व सडतात. WHOच्या मते ब्यूबॉनिक प्लेग हा जास्त खतरनाक नाही आहे आणि चीन योग्य प्रकारे या परिस्थितीशी सामना करत आहे. वाचा-कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी होते शरीराची अवस्था WHOच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "चीन आणि मंगोलिया प्रशासनासह एकत्रितपणे आम्ही ब्यूबॉनिक प्लेगवर सतत लक्ष ठेवत आहोत. आम्हाला असे वाटत नाही की ब्यूबॉनिक प्लेगचा धोका जास्त आहे परंतु सावधगिरीने निरीक्षण केले जात आहे आणि घाबरण्यासारखे काहीही नाही. बुबोनिक प्लेगमुळे लिम्फनोड्समध्ये जळजळ होते. सुरुवातीला, रोग ओळखणे कठीण आहे कारण त्याची लक्षणे तीन ते सात दिवसांनंतर दिसतात आणि इतर कोणत्याही फ्लूसारखी असतात. वाचा-अभिमानास्पद! एका शेतकऱ्याचा मुलगा तयार करतोय पहिली मेड इन इंडिया लस कोरोनापेक्षा भयंकर आहे ब्यूबोनिक प्लेग याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये अशी 4 प्रकरणे आली ज्यामध्ये प्लेगचे 2 धोकादायक प्रकार आढळले. त्याला न्यूमोनिक प्लेग असे म्हणतात. चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील एका शहरात ब्यूबोनिक प्लेगचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो. वाचा-अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या