Home /News /national /

Kalpana Chawla Birth Anniversary: भारताची पहिली महिला 'Space Star', त्यांच्या या गोष्टी माहितीयेत का?

Kalpana Chawla Birth Anniversary: भारताची पहिली महिला 'Space Star', त्यांच्या या गोष्टी माहितीयेत का?

नासाने 18 नोव्हेंबर 1997 ला सुरू केलेल्या STS-87 या अवकाश मोहिमेतील सहा अंतराळवीरांमध्ये कल्पना यांचा समावेश होता. ही त्यांची पहिली अंतराळ मोहीम होती. त्यानंतर STS-107 या मोहिमेत त्या सहा अंतराळवीरांसोबत अवकाशात गेल्या होत्या.

नवी दिल्ली, 17 मार्च : अंतराळ विज्ञानाची भारताला प्रचंड मोठी परंपरा आहे. अनेक ऋषीमुनींनी तेव्हा मांडलेले सिद्धांत आजही अचूक ठरतात. त्यांनी मांडलेली सूत्रही आधुनिक शास्रज्ञांना मार्गदर्शक ठरतात. आधुनिक अंतराळ विज्ञानात भारतीय शास्रज्ञांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचं. दिवंगत कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 ला भारतातील हरियाणामध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच खगोलशास्र, अंतराळ विज्ञान या विषयांमध्ये रुची होती त्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रातलं शिक्षण घेतलं आणि पुढे 1991 ला त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. कल्पना यांना अमेरिकेची नागरिकताही त्याचवर्षी मिळाली. त्यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या अस्ट्रोनॉट कॉर्प्समध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज दिला. नासाने 18 नोव्हेंबर 1997 ला सुरू केलेल्या STS-87 या अवकाश मोहिमेतील सहा अंतराळवीरांमध्ये कल्पना यांचा समावेश होता. ही त्यांची पहिली अंतराळ मोहीम होती. त्यानंतर STS-107 या मोहिमेत त्या सहा अंतराळवीरांसोबत अवकाशात गेल्या होत्या.

(वाचा - आर्ची सिंगचा परदेशात डंका; Miss Trans International जिंकणारी पहिली भारतीय)

अवकाशातून परतताना त्या अवकाश यानाचा पृथ्वीच्या कक्षेजवळ येत असतानाच 1 फेब्रुवारी 2003 ला स्फोट झाला त्यामध्ये यानातील सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना पुन्हा पृथ्वीवर परतल्याच नाही. नासाचं हे कोलंबिया यान पृथ्वीवर परतत असताना अमेरिकेतील टेक्सासच्या वरील भागात असतानाच त्याचा स्फोट झाला होता.

(वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

त्यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी - कोलंबिया प्लाइट STS-87 या नासाच्या अंतराळ यानातील सहा अतंराळवीरांमध्ये कल्पना चावला यांचा समावेश होता. हे यान 19 नोव्हेंबर 1997 ला अवकाशात झेपावलं. कल्पनाने कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातून एरोस्पेसमध्ये त्यांची पीएचडी पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथे त्यांनी कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स (CFD) विषयात संशोधन केलं. व्हर्टिकल अँड ऑर शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग कन्सेप्ट्स (V/STOL) हा त्यांचा विषय होता.

(वाचा - फुलराणी झाली 31 वर्षांची! ...म्हणून आजीने महिनाभर पाहिलं नव्हतं सायनाचं तोंड)

नासाच्या STS-107 या अंतराळ मोहिमेसाठी कल्पना यांची 2001 मध्ये निवड झाली. याच मोहिमतून परतताना 1 फेब्रुवारी 2003 ला यानाला झालेल्या अपघातात कल्पनाचा मृत्यू झाला. दक्षिण अमेरिकेतील टेक्सास भागाच्या वर अंतराळयान कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत होतं ते पृथ्वीवर लँड व्हायला केवळ 16 मिनिटांचा वेळ होता तेव्हाच त्याचा प्रचंड स्फोट झाला. तत्कालीन भारतीय सरकारने MetSat या सॅटेलाइट्सच्या मालिकेला 'कल्पना' हे नाव देण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. कर्नाटक सरकारने 2004 मध्ये तरुण महिला शास्रज्ञाचा गौरव करण्यासाठी कल्पना चावला यांच्या नावाने पुरस्कार देणं सुरू केलं. कल्पना चावला यांच्या अतुलनीय कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात तसंच अमेरिकेत अनेक रस्ते, चौक, विद्यापीठांनाही त्यांचं नाव देण्यात आलं आहे. तसंच कल्पनाच्या नावे अनेक शिष्यवृत्तीही सुरू केल्या गेल्या आहेत.
First published:

Tags: Kalpana chawla, Nasa, Space Centre, Space star, Spacecraft

पुढील बातम्या