मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ट्रान्सजेंडर आर्ची सिंगचा परदेशात डंका; Miss Trans International जिंकणारी पहिलीच भारतीय

ट्रान्सजेंडर आर्ची सिंगचा परदेशात डंका; Miss Trans International जिंकणारी पहिलीच भारतीय

मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021 (Miss International Trans ) स्पर्धेत भारताच्या (India) आर्ची सिंग (Archie Singh) या 22 वर्षांच्या ट्रान्सजेंडर (Transgender Women) युवतीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथमच भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळालं आहे.

मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021 (Miss International Trans ) स्पर्धेत भारताच्या (India) आर्ची सिंग (Archie Singh) या 22 वर्षांच्या ट्रान्सजेंडर (Transgender Women) युवतीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथमच भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळालं आहे.

मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021 (Miss International Trans ) स्पर्धेत भारताच्या (India) आर्ची सिंग (Archie Singh) या 22 वर्षांच्या ट्रान्सजेंडर (Transgender Women) युवतीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथमच भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळालं आहे.

पुढे वाचा ...

  कोलंबिया, 16 मार्च : कोलंबियात (Colombia) झालेल्या मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021 (Miss International Trans) स्पर्धेत भारताच्या (India) आर्ची सिंग (Archie Singh) या 22 वर्षांच्या ट्रान्सजेंडर (Transgender Woman) युवतीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथमच भारताला या स्पर्धेत विजेतेपद मिळालं आहे. भारतातील ट्रान्सजेंडर समुदाय आणि देशासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे. 2021 मध्ये भारतातील एक सामान्य ट्रान्सजेंडर महिला ते आंतराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी स्पर्धक असा आर्ची सिंगचा प्रवास अतिशय रोमांचक आणि तितकाच कठिणही होता. दिल्लीत राहणारी आर्ची सिंग हिनं लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीरूप धारण केलं आहे. वयाच्या सतराव्या वर्षी आर्ची सिंग पहिल्यांदा आपल्या स्त्री रुपात जगासमोर आली. मॉडेलिंगच्या क्षेत्रातही तिनं मोठं नाव कमावलं आहे.

  सुरुवातीच्या काळात मॉडेलिंगच्या (Modelling) क्षेत्रात कामासाठी विचारणा करत असताना, ‘तू खरी स्त्री नाहीस’, असं आर्ची सिंगला एका एजंटनं ऐकवलं होतं. आर्ची सिंगने त्यांना सांगितलं की, ती महिलाच आहे. ट्रान्स असली तरी इतर सामान्य महिलांसारखीच आहे. तिच्या अधिकृत सरकारी ओळखपत्रावरदेखील ती महिला असल्याचा उल्लेख आहे. तरीही त्या लोकांनी तिला ते काम दिलं नाही. त्यांना महिला मॉडेल हवी होती; पण ट्रान्सवूमन नको होती, मात्र तसं स्पष्टपणे सांगायला ते तयार नव्हते. आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर (TransGender) लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन किती दुषित, संकुचित आहे, याचा अतिशय विदारक अनुभव आर्ची सिंगला आला. ‘न्यूज 18’शी बोलताना तिने ही आठवण सांगितली.

  (वाचा - काय ती धडपड! अर्धनग्न झाली तरीही चोरी करुनच ठोकली धूम, Video Viral)

  एक ट्रान्सजेंडर महिला ते मॉडेल आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा आर्ची सिंगचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण आहे. कोलंबिया इथे पोहोचल्यावर स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांना जेव्हा ती भेटली तेव्हा तिला जाणीव झाली की ती एकटी नाही. त्यामुळे तिचा आत्मविश्वास अधिक वाढला.

  ‘या स्पर्धेमुळे आम्हाला स्वतंत्रपणे कोणत्याही भेदभावाशिवाय स्वतःला सादर करण्याची संधी मिळाली आहे,’ असं मत आर्ची सिंगनं व्यक्त केलं. आपण एका मोठ्या समुदायाचा एक भाग आहोत, ही जाणीव उत्साहवर्धक होती. या स्पर्धेत भाग घेण्याचं तिचं स्वप्न होतं. आता आपला देश, एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदाय आणि आपले आई-वडील यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणं ही माझी जबाबदारी होती त्यामुळे उत्साहाबरोबर दडपणही होतं, असं आर्ची सिंगनं सांगितलं. आर्चीला यात पहिला क्रमांक मिळाला नाही; पण तिनं त्याहूनही अधिक काहीतरी मिळवलं आहे.

  (वाचा - थेट छाव्यासोबत स्डुडिओमध्ये केलं वेडिंग फोटोशूट; गुंगीच औषध देऊन फोटोसेशनचा आरोप)

  याबाबत बोलताना तिने सांगितलं की, आता मी एका मोठ्या कुटुंबाचा भाग झाले आहे. अनेक सकारात्मक, नवीन काहीतरी शिकवणारे अनुभव मी यानिमित्तानं घेतले आहेत. आता नवीन लोकांशी जोडलेलं नात आणखी घट्ट होणार आहे. अनेक वेगळ्या गोष्टी एकत्रितपणे करायच्या आहेत. माझ्या समाजासाठी आणि या समुदायाला समानता मिळवून देण्यासाठी एक ध्येय मिळालं आहे. हे जग आणखी सुंदर करण्याच्या दिशेनं एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि आता प्रोत्साहन देणारे खूप लोक मिळाले आहेत, अशा शब्दात आर्ची सिंगनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  (वाचा - सेक्स न करताच प्रेग्नंट राहिली तरुणी, हे नेमकं कसं घडलं?)

  दिल्लीतील (Delhi) एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढणाऱ्या आर्चीला शाळेत असतानाच आपल्या वेगळेपणाची जाणीव झाली होती. आपण मुलगी असल्याची तिची ठाम धारणा होती. तिच्या या प्रवासात तिला तिच्या घरच्यांनी खंबीर पाठिंबा दिला. तिनं जेव्हा स्त्री रुपातच जगासमोर येण्याचं ठरवलं तेव्हा तिचं सगळं कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहीलं. तिला तिचं मूळ रूप प्रत्यक्षात जगायचं होतं. खरी ओळख लपवून आभासी आयुष्य जगायचं नव्हतं. त्यामुळे वयाच्या सतराव्या वर्षी तिनं आपली खरी ओळख जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला आणि ती स्त्री रुपात जगासमोर आली. त्यानंतर तिनं मॉडेलिंगमध्ये आपली कारकीर्द घडविण्यास सुरुवात केली.

  ‘त्याआधी मी सामाजिक कार्य करत होते. ट्रान्स जेंडर म्हणजे नक्की काय, याबाबत जागरूकता निर्माण करणं, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करणं यासाठी प्रयत्न करत होते. मॉडेलिंगमुळे या कामाला मदतच झाली. अनेक संधी खुल्या झाल्या. त्यामुळे मॉडेलिंगबद्दलचं माझं प्रेम वाढतचं गेलं, असं आर्ची म्हणते.

  First published:
  top videos

   Tags: Career opportunities, India, International, Model, Transgender