• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO

भरदिवसा व्यावसायिकाला जिवंत जाळलं; 90 टक्के भाजलं शरीर, अंगावर शहारे आणणारा VIDEO

आगीत होरपळलेल्या या सराफा व्यापाऱ्यानं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र 90 टक्के शरीर भाजले आहे. ही सर्व थरारक घटवा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच कैद झाली.

 • Share this:
  फिरोजाबाद, 19 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एक धक्कादायक प्रकार घडला. फिरोजाबाद पोलीस स्टेशनच्या द्वारिकाधीश भागात सराफा व्यापाऱ्याला जिवंत जाळण्यात आले. आगीत होरपळलेल्या या सराफा व्यापाऱ्यानं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र 90 टक्के शरीर भाजले आहे. ही सर्व थरारक घटवा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच कैद झाली. सराफा व्यापाऱ्याला लगेचच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. असे सांगितले जात आहे की, फिरोजाबादमधील घंटघर कृष्णा पाडा येथील राहणारे राकेश वर्मा यांचे सोन्याच्या दागिने दुकान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकाशी वाद झाला होता. मंगळवारी संध्याकाळी संतप्त आरोपी त्याच्या दुकानात पोहोचला, आणि थिनर अंगावर टाकून आग लावली. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. वाचा-सलमान खानला मारण्यासाठी शार्प शूटर होता मुंबईत, तुरुंगात रचत होता खुनाचा कट वाचा-नागपूर: डॉक्टर कुटुंबाच्या आत्महत्येचं गूढ वाढलं, समोर आली धक्कादायक माहिती आग लावल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. तर, राकेश वर्मा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. स्वत: चा बचाव करण्यासाठी राकेश यांना पळताना पाहून लोकं घाबरले. आगीचा गोळा रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र दिसत होते. यामुळे बाजारपेठेत भीती पसरली आहे . काहींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाचा-'तू मला आवडतेस...' असं म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार एसपी ग्रामीण राजेश कुमारही घटनास्थळी पोहोचले. गंभीरपणे जळलेल्या राकेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एसपी ग्रामस्थांनी सांगितले की, व्यावसायिकाला त्याच्या स्वत: च्या चुलत भावानं जाळल्य़ाची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: