नागपूर 18 ऑगस्ट: नागपूरमध्ये एका डॉक्टरने आपल्या पती आणि मुलांसह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आता या आत्महत्येविषयी खळबळजनक माहिती बाहेर आली आहे. डॉक्टर सुनेशी सकाळी बोलणं झालं होतं असा त्यादावा तिच्या सासुने केला आहे. ते बोलणं झाल्यानंतर डॉक्टर सुनेनेसुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती समोर आलीय. त्यामुळे सगळ्या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.
सामुहिक आत्महत्येच्या घटनेनं मंगळवारी नागपूरात खळबळ उडाली. पती पत्नी आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. एकाच कुटूंबतील चार जणांची आत्महत्या केल्याने सगळेच हादरुन गेले आहेत. कोराडी रोड ओमनगर परीसरातील राणे कुटुंबियांनी हा टोकाचा निर्णय घेतला. धीरज राणे हे प्राध्यापक आहेत, तर पत्नी सुषमा राणे या डॉक्टर आहेत. 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी लावण्या यांचाही यात समावेश आहे. आत्महत्येचं कारण अजुन कळालेलं नाही.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. या घटनेने राणे कुटुंबीय आणि त्यांच्या शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. या बाबात मिळालेली प्राथमिक माहिती आणखी धक्कादायक आहे.
घरात घुसणे जीवावर बेतले, नागरिकांनी केलेल्या मारहाणीत चोराचा मृत्यू
राणे हे कुटुंबासह कोराडी नजीक ओम नगर येथे राहत होते. धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरा पर्यंत उठले नाही म्हणून त्यांच्या आईने आवाज दिले. त्यावेळी त्या धीरज यांची पत्नी सुषमा त्यांच्याशी बोलल्या. पोळ्याची सुटी असल्याने त्यांना झोपू द्या असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सुषमा यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळली आहे. सुषमा राणे डॉक्टर होत्या तर धीरज नामांकित कॉलेजमध्ये लेक्चरर होते. धीरज आणि त्यांच्या मुलांचा मृतदेह हा बेडवर आढळून आल्याचीही माहिती आहे.
अमेरिकेत गोळीबारात मारला गेला 5 वर्षांचा चिमुरडा; अंत्यसंस्कारासाठी जमले 5.2 कोट
डॉ. सुषमा यांनी आधी तिघांनी इंजेक्शन दिलं आणि ते गेल्याची खात्री झाल्यावर दुपारी आत्महत्या केली असं दिसत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर या मागे काही घातपात आहे का? याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.