• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • धक्कादायक! सलमान खानला मारण्यासाठी शार्प शूटर होता मुंबईत, तुरुंगात रचत होता खुनाचा कट

धक्कादायक! सलमान खानला मारण्यासाठी शार्प शूटर होता मुंबईत, तुरुंगात रचत होता खुनाचा कट

salman khan

salman khan

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानल मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिली होती. एवढेच नाही तर राहुलने जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती.

 • Share this:
  फरिदाबाद, 19 ऑगस्ट : अभिनेता सलमान खान चाहते जगभरात आहे, मात्र त्याच्यासोबत शत्रुत्व असणारेही कमी नाही आहेत. यातूनच एक धक्कादायक प्रकार घडणार आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या गँगने सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, पोलिसांनी या शार्प शुटरला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या एका शार्प शूटरने कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू केल्यामुळे हा प्लॅन फसल्याचे सांगितले. या गँगचा शार्प शूटर राहुल उर्फ सांगा उर्फ बाबाला फरीदाबाद पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोईने सलमानल मारण्याची जबाबदारी शार्प शूटर राहुलला दिली होती. वाचा-संजय दत्तही झाला भावुक; रुग्णालयात रवाना होता चाहत्यांना केली विनंती एवढेच नाही तर राहुलने जानेवारीत मुंबईत य़ेऊन सलमान खानच्या वांद्रे येथील घराची पाहणीही केली होती. दरम्यान, फरीदाबाद पोलीस एका व्यक्तीच्या खुनाचा तपास करत असताना राहुलला अटक केली. त्यावेळी त्यानं सलमान खानच्या खुनाचा कट रचत असल्याचे मान्य केले. वाचा-सुशांत मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्तीला मोठा झटका; फिल्ममध्ये मिळणार नाही काम याआधीही सलमानला मारण्याची दिली होती धमकी याआधी लॉरेंस बिश्नोईने हरिणाच्या शिकारीवरुन सलमानला मारण्याची धमकी दिली होती. जून 2018 मध्येही लॉरेंसने आपल्या जवळच्या कुख्यात गुंड संपत नेहराला सलमानच्या मागावर पाठवले होते. यामागे कारण होते ते सलमानचे काळवीट प्रकरण. राजस्थानमधील बिश्नोई समाज काळवीटाची पुजा करतात. सलमान खानवर काळवीटाला मारण्याचा आरोप आहे. सलमानविरोधात बिश्नोई समाजाने हा खटला दाखल केला आहे. तेव्हापासून बिश्नोईने सलमानला मारण्याचा कट रचला होता.
  Published by:Priyanka Gawde
  First published: