Home /News /crime /

'तू मला आवडतेस...' असं म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; आरोपी अटकेत

'तू मला आवडतेस...' असं म्हणत कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; आरोपी अटकेत

विनायक पाटील असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

कोल्हापूर, 18 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पोश्रातवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. विनायक पाटील असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. आजरा पोलिसात आरोपी विनायक पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील एका अल्पवयीन मुलीला तू मला आवडतेस,मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून सप्टेंबर 2018 मध्ये ओळख करून घेतली. त्यानंतर तिच्याशी सतत मोबाईलवर संपर्क ठेवला. नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आहे. हेही वाचा- मुंबईजवळ विवाहित महिलेच्या घरात घुसून केला बलात्कार, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात घरात कोणी नसताना जावून शारीरिक संबंध ठेवले. मुलीच्या पोटात दुखत असल्याने आई समवेत ती आजरा शहरात येवून एका डॉक्टरला दाखवले. त्यावेळी मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर घडलेला प्रकार मुलींना आईस सांगितला. या नराधमाच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली होती. दरम्यान, आता आरोपी विनायक पाटील याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत बाल लैंगिक अत्याचाराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Kolhapur

पुढील बातम्या