जाहिरात
मराठी बातम्या / देश / Jammu Kashmir: चकमकीने उजडला सोमवार, 15 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन

Jammu Kashmir: चकमकीने उजडला सोमवार, 15 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन

Jammu Kashmir: चकमकीने उजडला सोमवार, 15 व्या दिवशीही सर्च ऑपरेशन

Jammu Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील सुरनकोट (पुंछ) आणि राजौरी जिल्ह्यातील थानामंडीच्या शेजारील वनक्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मेंढर, 25 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरमधील सुरनकोट (पुंछ) आणि राजौरी जिल्ह्यातील थानामंडीच्या शेजारील वनक्षेत्रात गेल्या 15 दिवसांपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. काही काळ गोळीबार थांबल्यानंतर, आज सकाळपासून मेंढरच्या भट्टा दुरियन जंगलात पुन्हा गोळीबार सुरू (firing resume on 15th day of search operation) झाला. याठिकाणी भारतीय सैन्यांकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे.11 आणि 14 ऑक्टोबर रोजी सुरनकोट आणि मेंढर परिसरात झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात एकूण नऊ लष्करी जवान शहीद झाले होते. यानंतर आता गेल्या पंधरा दिवसांपासून संबंधित ठिकाणी भारतीय जवान शोध मोहीम राबवत आहेत. दुसरीकडे, काल (रविवारी) पूंछ जिल्ह्यातील जंगलात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने तीन सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. यामध्ये अटकेत असलेल्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा देखील मृत्यू झाला आहे. हेही वाचा- IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, पाहा VIDEO एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा पाकिस्तानी दहशतवादी डिटेन्यू झिया मुस्तफा हा गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्याच्या ताब्यात होता. सध्या सुरू असलेल्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान, लपून बसलेल्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या ठिकाणांची ओळख पटवण्यासाठी डिटेन्यू झिया मुस्तफा याला भाटा दुरियन येथे नेण्यात आलं होतं. यावेळी जंगल परिसरात लपून बसलेल्या काही दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला आहे. ज्यामध्ये लष्कराचे तीन जवान आणि एक कनिष्ठ तपास अधिकाऱ्याचा (जेसीओ) मृत्यू झाला आहे. हेही वाचा- जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, JCO सहित 2 जवान शहीद शोध मोहिमेदरम्यान, शोध पथक दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणांजवळ पोहोचलं असता,  दहशतवाद्यांनी पुन्हा पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला. ज्यामध्ये दोन पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाला. झिया मुस्तफा याला देखील दुखापत झाली होती. अतिरिक्त सैन्यदल आल्यानंतर, संबंधित परिसरातवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. तसेच झिया मुस्तफाचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून परत मिळवण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात