Home /News /national /

IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, VIDEO आला समोर

IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, VIDEO आला समोर

जेव्हा पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात तेव्हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी या बंकरचा वापर केला जातो.

    श्रीनगर, 24 ऑक्टोबर : 370 कलम रद्द केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा पाहिल्यांदाच जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर (Home Minister Amit Shah visit to Jammu and Kashmir) आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान आज भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच असल्यामुळे भारतीय नागरिक टीव्हीला खिळून बसले आहेत. जेव्हा भारत पाक (IND vs PAK  Cricket Match) मॅच सुरू होती, त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील एका मकबाल नावाच्या गावातील कम्युनिटी बंकरचं निरीक्षण करीत होते. जेव्हा पाकिस्तानी सैनिक गोळीबार करतात तेव्हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी या बंकरचा वापर केला जातो. (Amit Shah arrives in bunker on Indo Pak border during IND vs PAK match VIDEO came in front) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. अमित शहा यांनी आज जम्मूत मोठ्या जनसभेला संबोधित केलं. यानंतर गृहमंत्री आरएस पुरा सेक्टरमध्ये भारत-पाक बॉर्डरच्या शेवटच्या पोस्टवर पोहोचले आणि सैनिकांचं मनोबल वाढवलं. यादरम्यान जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हादेखील गृहमंत्र्यांसोबत होते. बीएसएफ जवानांची भेट घेतल्यानंतर त्यांना भेटवस्तूदेखील दिल्या. इतकच नाही तर गृहमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांसह चहाचा आस्वाद घेतला. दुसरीकडे आजच्या मॅचबद्दल सांगायचं झाल्यास, पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाने टीम इंडियाला वाचवलं आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं आहे.भारताला 20 ओव्हरमध्ये 151/7 एवढा स्कोअर करता आला. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रुपात भारताला पहिले दोन धक्के दिले, यानंतर हसन अलीने सूर्यकुमार यादवला आऊट केलं. हे ही वाचा-ND vs PAK : ज्याची भीती होती तेच झालं, शाहिन आफ्रिदीने रेकॉर्ड कायम ठेवलं! पण विराटने ऋषभ पंतच्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले. विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन तीन विकेट घेतल्या. आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला आऊट केलं, तर हसन अलीला 2 विकेट घेण्यात यश आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amit Shah, India vs Pakistan, Jammu and kashmir

    पुढील बातम्या