मराठी बातम्या /बातम्या /देश /

व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमुळं Google CEO सुंदर पिचाई अडचणीत, तक्रार दाखल

व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओमुळं Google CEO सुंदर पिचाई अडचणीत, तक्रार दाखल

पोलीस ठाण्यात दाखल एका FIR ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 18 लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून यात गूगल सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्या नावाचाही समावेश आहे.

  • Published by:  Kiran Pharate

वाराणसी 12 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील भेलूपुर ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका FIR ची सगळीकडंच चर्चा रंगली आहे. यात तब्बल 18 लोकांविरुद्ध आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या 18 लोकांमध्ये एक नाव असं आहे, ज्याची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. हे नाव आहे गूगल (Google) सीइओ सुंदर पिचाई(CEO Sundar Pichai) यांचं. त्यांच्याविरुद्ध कट रचणे आणि आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल केली गेली आहे.

हे एफआयआर न्यायालयाच्या आदेशानंतर 6 फेब्रुवारीला दाखल केलं गेलं आहे. वाराणसीच्या गौरीगंज परिसरात राहाणाऱ्या गिरीजा शंकर यांनी ही तक्रार केली आहे. गिरीजा शंकर यांचा आरोप आहे, की व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये एका व्हिडीओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टिप्पणी केली गेली. गिरीजानं त्या नंबरवर फोन करत त्या व्हिडीओवर आक्षेप घेतला. यानंतर यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकला गेला. यात गिरीजा शंकरचा मोबाईल नंबर टाकण्यात आला. त्यानंतर सतत त्यांना आपल्या फोनवर जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत.

धमकीचे 8 हजार 500 फोन -

गिरीजा शंकरचा मोबाईल नंबर यूट्यूबवर टाकणाऱ्या व्यक्तीचं नावं विशाल सिंह असं आहे. त्यानं यूट्यूबवर एक व्हिडीओ बनवला आणि गिरीजा शंकरचा नंबर त्यात अपलोड करत एक गाणं बनवलं की या व्यक्तीकडून त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हापासून गिरीजा शंकरला आतापर्यंत 8 हजार 500 फोन आले आहेत. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिव्या दिल्या जात आहेत. गिरीजा शंकरनं याप्रकरणी गिरीजा शंकरनं याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असता भेलुपूर ठाण्यात तक्रार दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले गेले. यानंतर गिरीजानं भेलूपुर ठाण्यात 18 लोकांविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस तपास सुरू -

या 18 लोकांमध्ये गूगल सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह गुगलच्या इतर दोन अधिकाऱ्यांची नावंही आहेत. या सर्वांवर आयटी अॅक्ट आणि कट रचण्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. देशात सध्या ट्वीटरवरील कंटेटवरून ट्वीटरसोबत बातचीत सुरू असतानाच आता गुगल सीईओंविरोधात तक्रार दाखल झाल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.

First published:

Tags: Google, Police fir, Youtube