बागपत, 21 जून : आतापर्यंत दोन गटांमध्ये हाणामारी अशा बातम्या आपण वाचल्या असतील. पण उत्तर प्रदेशातील दोन महिलांच्या गटात हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे. या महिलांनी तुफान हाणामारी केली. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील कोतवाली भागात महिलांच्या दोन गटात जमिनीच्या हक्कावरुन भांडण झाले. दोन्ही गटातील डझनभर महिलांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जमिनीवरुन या दोन्ही गटांमध्ये वाद आहे. एका गटातील महिलांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र दुसऱ्या गटातील महिलांनी जोरदार हल्ला केला.
यानंतर दोन्ही बाजूंच्या सुमारे डझनभर महिला समोरासमोर आल्या आणि भांडण, मारहाण व शिवीगाळ सुरू झाली. महिलांचं भांडण पाहून लोकांनी हस्तक्षेप केला. पण तोपर्यंत बर्याच महिलांना गंभीर दुखापत झाली होती. अनेक स्त्रियांच्या हात, पाय आणि नाकाला जखमा झाल्या होत्या. या महिलांना बागपत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोतवाली शहरातील सूरजपूर गावात महिलांमधील वादाचा व्हिडीओ समोर आला आहेत. नरेश आणि नरेंद्र यांच्यात जमिनीबाबत वाद सुरू होता. त्यावरुन दोन्ही बाजूंच्या महिलांवर जोरदार हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी अनेकांना घेतलं ताब्यात
या भांडणात अनेक महिला जखमी झाल्या आहेत. यांच्यावर बागपत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या अनेकांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचा-
भावासोबत कट रचून मैत्रिणीला घरी बोलावलं, नंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
पाईपलाईनजवळ होती दुचाकी, पण जागेवर नव्हता सुरक्षारक्षक, पुढे जाऊन पाहिले तर...
कसं गेलं सुर्यग्रहण? आईने आणली खाण्यावरच बंदी; भन्नाट मीम्स पाहून पोट धरून हसाल मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.