आंबेडकर नगर (उत्तर प्रदेश), 21 जून : सगळ्या नात्यांमध्य मैत्री हे एक असं नातं आहे जे फक्त विश्वासावर टिकतं. पण याच मैत्रिचं एक भयानक रुप समोर आलं आहे. या घटनेमुळे तरुणाईमध्ये खळबळ उडाली आहे. एका मुलीच्या भावाने तिच्या मैत्रिणीवर हल्ला करुन बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेमध्ये मुलीचाही हात असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तिला लखनऊमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका युवतीसह 2 जणांना अटक केली असून कडक कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. हे प्रकरण आंबेडकर नगर इथल्या जहांगीरगंज ठाणा परिसरातलं आहे. जिथे एक मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली. घरात आधीच प्लान करून बसलेल्या मैत्रिणीच्या भावाने तरुणीवर बलात्कार केला. इतकंच नाही तर विरोध केला म्हणून तिला मारहाणदेखील केली असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अल्पवयीन तरुणी घरी गेली आणि तिने सर्व प्रकरण कुटुंबियांना सांगितलं. जहांगीरगंज पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी मुलगी आणि मुलाला अटक केली आहे. पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलं, जिथे तिची मानसिक स्थिती पाहून डॉक्टरांना लखनऊ इथे उपचारासाठी पाठवलं आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.