पाईपलाईनजवळ होती दुचाकी, पण जागेवर नव्हता सुरक्षारक्षक, पुढे जाऊन पाहिले आणि...

पाईपलाईनजवळ होती दुचाकी, पण जागेवर नव्हता सुरक्षारक्षक, पुढे जाऊन पाहिले आणि...

टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची पाहणी करण्यासाठी ते गस्त करीत असताना रात्रीच्या अंधारात त्यांचा पाय घसरून ते पाच फूट खोल असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले.

  • Share this:

भिवंडी, 21 जून : मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारातील येवई (पांजरापोळ) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाईपलाईनवरील उघड्या चेंबरमध्ये पडून गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकाचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे.

शिवराम बुधाजी भोईर ( 57 रा.मोहाचा पाडा,पुंडास ) असे उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या घटनेनं पालिका वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पुंडास ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शर्मिला भोईर यांचे पती होते. ते गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.

शनिवारी रात्री रात्रपाळीची ड्युटी असल्याने ते आपले कर्तव्य बजावत होते. पांजरापोळ येथून जवळच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची पाहणी करण्यासाठी ते गस्त करीत असताना रात्रीच्या अंधारात त्यांचा पाय घसरून ते पाच फूट खोल असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबरी मार लागून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.

पुण्यात पतीने आत्महत्या केल्याचं पाहिल्यावर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल

ही घटना त्यांचे सहकारी सुरक्षारक्षक सचिन महाजन व संजय कारभल हे शनिवारी दुपारी 3 वाजता ड्युटीवर आले असता त्यांना मृत शिवराम भोईर यांची दुचाकी पाण्याच्या टाकीजवळ दिसून आली. मात्र, भोईर कोठे दिसत नाहीत म्हणून त्यांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या साथीने त्यांचा शोध घेतला असता शिवराम भोईर हे पाईपलाईनच्या उघड्या चेंबरमध्ये मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले.

 

या घटनेची तात्काळ माहिती कुटुंबीयांना आणि तालुका पोलिसांना दिली असता पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून पुढील सोपस्कार पार पाडण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

भल्या मोठ्या जहाजाची लाटांनी केली दैना, मोठ्या दुर्घटनेची भीती, पाहा हा VIDEO

मात्र, मृत शिवराम भोईर यांचा घातपाताने मृत्यू झाला आहे किंवा कसे? या दृष्टीने देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 21, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या