मराठी बातम्या /बातम्या /देश /JNU ची माजी विद्यार्थी शहलावर वडिलांचा गंभीर आरोप, केली NGO विरूद्ध चौकशी करण्याची मागणी

JNU ची माजी विद्यार्थी शहलावर वडिलांचा गंभीर आरोप, केली NGO विरूद्ध चौकशी करण्याची मागणी

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शहलाने राजकारणात प्रवेश केला. आयएए टॉपर आणि नंतर राजकारणी झालेल्या शाह फैजलच्या जे. के. पॉलिटिकल मूव्हमेंटची संस्थापक सदस्य झाली. परंतु, नंतर तिने गेल्या वर्षी काश्मीरमधील राजकारणातून, मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शहलाने राजकारणात प्रवेश केला. आयएए टॉपर आणि नंतर राजकारणी झालेल्या शाह फैजलच्या जे. के. पॉलिटिकल मूव्हमेंटची संस्थापक सदस्य झाली. परंतु, नंतर तिने गेल्या वर्षी काश्मीरमधील राजकारणातून, मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शहलाने राजकारणात प्रवेश केला. आयएए टॉपर आणि नंतर राजकारणी झालेल्या शाह फैजलच्या जे. के. पॉलिटिकल मूव्हमेंटची संस्थापक सदस्य झाली. परंतु, नंतर तिने गेल्या वर्षी काश्मीरमधील राजकारणातून, मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ती शहला राशिदच्या (Shehla Rashid) वडिलांनी सोमवारी तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच तिच्या NGO ची चौकशी सुरू करावी, अशी मागणीही केली आहे. सोबतच काश्मीर खोऱ्यातल्या राजकारणात भाग घेण्यासाठी तिने मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोपही केला आहे. मात्र, शहलाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शहलाच्या कुटुंबियांनी तिचे वडिल अब्दुल राशिद शोरा (Abdul Rashid Shora) यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्याबाबतच्या सुनावणीत कोर्टाने अब्दुल राशिद शोरा यांना, त्यांच्या श्रीनगरमधील घरात जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तिचे वडील तिच्यावर घाणेरडे आणि निराधार आरोप करत असल्याचं शहलाने म्हटलं आहे.

शोरा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेलं तीन पानी पत्र दाखवलं आणि शहला, तिचा सुरक्षा रक्षक, बहीण आणि तिची आई यांच्यापासून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, "काश्मीरच्या राजकारणात येण्यासाठी तिने माजी आमदार इंजिनियर राशिद (Engineer Rashid) आणि व्यवसायिक जहूर वताली (Zahoor Watali) यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतले आहेत.'

(वाचा - भारतीय FAU-G Mobile Game लवकरचं लाँच होणार; Play Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू)

गेल्या वर्षी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (National Investigation Agency)दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी इंजिनीअर राशिद आणि व्यवसायिक असलेले वताली यांना अटक केली होती.

जेएनयूची माजी विद्यार्थी नेता (JNU student leader) शहलाने राजकारणात प्रवेश केला. आयएए टॉपर आणि नंतर राजकारणी झालेल्या शाह फैजलच्या जे. के. पॉलिटिकल मूव्हमेंटची संस्थापक सदस्य झाली. परंतु, नंतर तिने गेल्या वर्षी काश्मीरमधील राजकारणातून, मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. शहलाच्या NGO ची चौकशी करण्याबरोबरच त्यांच्या मुलींच्या आणि बायकोच्या बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणीही तिच्या वडिलांनी केली.

(वाचा - लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?)

परंतु, शहलाने ट्विटरवर सविस्तर प्रत्युत्तर देत सांगितलं की, 'माझ्या वडिलांनी माझ्यावर आणि माझ्या आईवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले आहेत असा व्हिडिओ तुमच्यापैकी बर्‍याच जणांना आला असेल. तो पत्नीला मारणारा आणि अपमानजनक गोष्टी बोलणारा माणूस आहे. शेवटी आम्ही त्याच्याविरूद्ध उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांनी केलेला स्टंट हा आमच्या कृतीची प्रतिक्रिया आहे.'

(वाचा - Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून नवे नियम जारी)

या आरोपांना अत्यंत घृणास्पद आणि निराधार म्हणत तिने सांगितलं की, आम्ही वडिलांविरुध्द काश्मीरमधील कोर्टात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे आणि कोर्टाने वडिलांना घरात प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे त्यांनी असे आरोप केले आहेत. ती म्हणाली, 'माझ्या आईने आयुष्यभर अत्याचार, हिंसाचार आणि मानसिक छळ सहन केला आहे. इतके दिवस कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी ती काही बोलली नाही, पण आता आम्ही तिच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारांविरूद्ध आवाज उठवला. त्यामुळे त्यांनीही आमच्यावर आरोप करण्यास सुरवात केली आहे.' वडिलांचे आरोप गांभीर्याने घेऊ नका अशी विनंतीही तिने केली आहे.

First published:

Tags: Jammu and kashmir, JNU