प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

प्रसिद्ध फॅशन डिझायनरचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू, बाथरुममध्ये सापडला मृतदेह

फॅशन डिझायनर शर्वरी दत्ता (Sharbari Dutta) यांचे धक्कादायक निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकाता याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. त्या 63 वर्षांच्या होत्या.

  • Share this:

कोलकाता, 18 सप्टेंबर : फॅशन डिझायनर शर्वरी दत्ता (Sharbari Dutta) यांचे धक्कादायक निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह कोलकाता याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. त्या 63 वर्षांच्या होत्या. ब्रॉड स्ट्रीट याठिकाणी असणाऱ्या त्यांच्या राहत्या घरी शर्वरी यांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला. त्याठिकाणी त्या एकट्या राहत होत्या. डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या कुटुंबीयांकडून अशी माहिती मिळाली की सकाळपासून त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या फोन उचलत नव्हत्या.

प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आल्याने शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. शर्वरी यांच्या पश्चात त्यांचा फॅशन डिझायनर मुलगा अॅमलिन दत्ता असा परिवार आहे.

(हे वाचा-बॅडमिंटन खेळताना अचानक बिघडली प्रकृती,अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू)

प्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या शर्वरी दत्ता आहेत. पण त्यांनी स्वत:ची अशी ओळख बनवली. त्यांनी फॅशन जगतात त्यांचा वेगळा असा ठसा उमटवला होता. महिविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी 'मेन्स एथनिक वेअर' डिझाइनिंगमध्ये  त्यांची छाप सोडली आहे. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीचे तर कलकत्ता युनिव्हरसिटीमधून मास्टर्स डिग्री पूर्ण केली होती. पुरुषांच्या कपड्यांमध्ये एकाचवेळी पारंपरिक आणि आधुनिक कल्पनांचा वापर, रंगाचा चपखल वापर यामध्ये शर्वरी यांची खासियत होती.

(हे वाचा-SSR Case: रिया ड्रग्ज प्रकरणात या 3 आरोपींच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी)

शर्वरी यांनी कोलकातामध्ये त्यांच्या Shunyaa या ब्रँडची स्थापना केली होती. त्याचे काही आऊटलेट्स कोलकाता याठिकाणी आहेत. त्यांनी महिलांच्या आउटफिटसाठी देखील फॅशन डिझायनिंग केले होते. अभिनेत्री विद्या बालन आणि अनेक कलाकारांनी त्यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले आहेत. शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या फॅशन शोचा चेहरा म्हणून शर्वरी यांची ओळख होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 18, 2020, 3:05 PM IST
Tags: Kolkata

ताज्या बातम्या