जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / SSR Case: रिया ड्रग्ज प्रकरणात या 3 आरोपींच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

SSR Case: रिया ड्रग्ज प्रकरणात या 3 आरोपींच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

तर सिनेमात दिशा सालियानच्या भूमिकेसाठी बिग बॉस फेम अभिनेत्री सोमी खानची निवड करण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये सुशांतच्या मृत्यूला दिशा सालियानच्या मृत्यूशी जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं मत चाहत्यांकडून वर्तवण्यात आलं आहे.

तर सिनेमात दिशा सालियानच्या भूमिकेसाठी बिग बॉस फेम अभिनेत्री सोमी खानची निवड करण्यात आली आहे. या स्टोरीमध्ये सुशांतच्या मृत्यूला दिशा सालियानच्या मृत्यूशी जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं मत चाहत्यांकडून वर्तवण्यात आलं आहे.

या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार आहे. आता या तिन्ही आरोपींना जामीन मिळतो की त्यांची जामीन याचिका फेटाळली जाते हे पाहावे लागेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सगळ्यांची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत ड्रग्ज नेटवर्कचे अनेक मोठा धागेदोरे NCB हाती लागले आहेत. यातल्या मुख्य आरोपींनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुनावणी होणार आहे. आता या तिन्ही आरोपींना जामीन मिळतो की त्यांची जामीन याचिका फेटाळली जाते हे पाहावे लागेल. शपथविधी असो वा विकास कामाची पाहणी, अजित पवारांच्या स्टाईलने सगळ्यांची उडते झोप! रिया ड्रग्ज प्रकरणात सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बासित परिहार, दिपेश सावंत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी या तिघांची जामीन याचिका मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळली होती. या प्रकरणात मिरांडा, बासित आणि दिपेशची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगण्यात येतं. सॅम्युअल मिरांडा सुशांतचा घर मॅनेजर आहे. जेव्हा चौकशीत रिया आणि शोविकचे मोबाईल चॅट्स समोर आले तेव्हा सॅम्युअल मिरांडा हा ड्रग्ज सप्लाय करायचा अशी माहिती समोर आली होती. अब्दुल बासित परिहार हा ड्रग पेडलर आहे. इतकंच नाही तर बासित फक्त रिया आणि शोविकच्या सांगण्यावरून ड्रग्जचा जुगाड करायचा. दिपेश सावंत सुशांतसिंग राजपूतचा नोकर आहे. ड्रग्ज प्रकरणातही त्याचाही हात असल्याचं समोर आलं आहे. आक्रमक मराठा आंदोलकांनी घेरला छगन भुजबळ यांचा फार्म, भेटणार नाही तोपर्यंत बसणार दरम्यान या प्रकरणात सुशांतच्या फार्म हाऊसचा मॅनेजर (Farmhouse Manager) पवनने सुशांत, रिया आणि तिच्या कुटुंबाबाबत मोठा खुलासा केला आहे. सुशांत आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर ड्रग्ज पार्टी करायचा. त्यामध्ये त्याचे सेलेब्रिटी मित्र नेहमी ड्रग्स घेत असत, असा कबुलीजबाब रियाने एनसीबीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दरम्यान सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजर पवनचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर रिपब्लिकन टीव्हीशी बोलताना त्याने सुशांत आणि रियाबाबत मोठी माहिती दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात