Home /News /national /

काँग्रेसचा कलश मोर्चा, पंतप्रधानांच्या घरी नेली शेतकऱ्यांच्या शेतातली माती!

काँग्रेसचा कलश मोर्चा, पंतप्रधानांच्या घरी नेली शेतकऱ्यांच्या शेतातली माती!

'101 कलशात विविध राज्यातील माती वाहून नेण्यामागे 2014 च्या पंतप्रधानांना आठवण करून दिली पाहिजे हा उद्देश होता'

नवी दिल्ली, 07 मार्च : कॉंग्रेसने (Congress) दिल्लीतील (Delhi) कॉंग्रेसच्या मुख्यालयापासून (Congress Headquarters) पंतप्रधान निवासस्थानाकडे (PM House) आज कलश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी आंदोलनाचे 101 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 101 खेड्यांनी 100 कलश घेऊन पंतप्रधान निवासस्थानपर्यंत (Prime Minister's residence) हा कलश मोर्चा काढण्याचा प्रयत्न किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. किसान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र सोलंकी यावेळी  म्हणाले की, '101 कलशात विविध राज्यातील माती वाहून नेण्यामागे 2014 च्या पंतप्रधानांना आठवण करून दिली पाहिजे हा उद्देश होता. पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीत ज्यात त्यांनी देशाच्या मातीबद्दल इच्छा दाखविली होती. यावेळी 3 कृषी कायदे मागे घेण्याची मागणी देखील या निमित्याने करण्यात आली. वेगवान घडामोडी : राज ठाकरेंनंतर काँग्रेस नेत्यानेही लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र या किसान कलश मार्चाला किसान कॉंग्रेसचे शेतकरी व कामगार कॉंग्रेस कार्यालयाबाहेर 50 मिटर अंतरावर पोलिसांनी रोखले. या परिसरात कलम १४४ च्या अंमलबजावणीमुळे किसान कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊ दिले  जाणार नाही, असे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले. रस्त्याचे सुरू होते काम, अचानक विजेच्या तारेला चिटकून कामगाराचा मृत्यू या सर्वांना  कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर थांबविण्यात आले आहे. गेल्या 101 दिवसापासून राजधानी दिल्लीच्या  सीमा भागांमध्ये काँग्रेसकडून  शेतकऱ्यांना आंदोलनासाठी सहकार्य केले जात आहे. मात्र, सरकारच्या तोंडावरील माशी उडत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच सिंधु बॉर्डर, गाजीपूर बॉर्डर आणि तिहेरी बॉर्डर वरती शेतकरी आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने तात्काळ तीनही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी शेतकरी करत आहे. जोपर्यंत कृषी कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असे स्पष्टपणे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, Delhi, Farmers protest, India, PM narendra modi

पुढील बातम्या