Home /News /maharashtra /

रस्त्याचे सुरू होते काम, अचानक विजेच्या तारेला चिटकून कामगाराचा मृत्यू

रस्त्याचे सुरू होते काम, अचानक विजेच्या तारेला चिटकून कामगाराचा मृत्यू

जर सेफ्टी किट असती तर सुरेश यांचा जीव वाचला असता, असं इतर कामगार म्हणत आहेत.

बीड, 07 मार्च : बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई- मांजरसुंबा (Ambajogai to Manjarsumba road) रस्त्याचे काम सुरू असताना नांदूर (Nandur) फाट्याजवळ  रस्ते मोजणीचे काम करणाऱ्या मजुराचा विजेच्या तारेला चिटकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  रस्ते बनवणाऱ्या एसपीएम कंपनीच्या (SPM Company) हलगर्जीपणामुळे मजुराचा बळी गेल्याने नातेवाइकाकडून संताप व्यक्त केला जात असून अद्याप पर्यंत प्रेत ताब्यात घेतले नाही. सुरेश रामराव जेधे असं मयत मजुराचं नाव आहे तो केज तालुक्यातील जोला गावातील रहिवाशी आहे. एसपीएम कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईक आक्रमक असून पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी केला आहे. रात्रीपासून मृतदेह ताब्यात न घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल अंबाजोगाई -केज - मांजरसुंबा या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडले असून या रस्त्याचा ठेका एसपीएम कंपनीने घेतलेला आहे. यात नांदूर फाट्याजवळ रस्ता मोजण्याचे काम सुरू असताना सुरेश रामराव जेधे हे काम करत होते. अचानक विद्युत तारेला मोजणीचे साहित्य लागल्याने त्यांना देखील वीजेचा धक्का लागला आणि  जागीच मृत्यू झाला. जर सेफ्टी किट असती तर सुरेश यांचा जीव वाचला असता असं इतर कामगार म्हणत आहेत. मजुरांकडून काम करून घेताना कंपनीने त्यांच्या जीविताची काळजी घेणे व सुरक्षेची खबरदारी घेणे गरजेचे असताना अशा पद्धतीने झालेले नाही म्हणून देखील तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यातच गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला आहे. असे असून देखील कंपनीला वारंवार तक्रार निवेदन देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून देखील संताप व्यक्त केला जात आहे. यातच रस्त्याचे काम सुरू असताना निष्काळजीपणामुळे व कंपनीचा बेजबाबदारपणामुळे एका मजुराचा विद्युत तारेला चिटकून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. इतक्या पैशांत ड्रेसच काय अख्खी गाडीच घ्याल; श्रद्धाच्या फ्रॉकची किंमत पाहून उडाल यासंदर्भात कंपनी व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क झाला नाही. नेकनूर पोलीस नातेवाईकांच्या तक्रारीवरून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Death, Electrical wire, Nandur, Road measurement, Worker, बीड

पुढील बातम्या