कोणत्याही आई- वडिलांसाठी आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं सर्वात महत्त्वाचं असतं. पण अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात हे कठीण काम आहे कारण आई-वडील दोघेही काम करत असल्यानं त्यांना मुलांसाठी वेळ देणं अशक्य असतं. पण सध्याच्या लॉकडाउनचा यासाठी तुम्ही योग्य वापर करु शकता. अशा काही गोष्टी ज्या तुम्ही मुलांना शिकवल्याच पाहिजे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचनचं काम फक्त मुलींचंच आहे असं नाही. मुलांनीही हे काम शिकणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मुलांनाही किचनमधली किमान गरजेची नक्की द्या.
अनेकदा मुलांना ‘मुलींसारख का रडतोस?’ असं म्हटलं जातं. पण रडणं ही एक भावना आहे. प्रत्येकामध्ये सगळ्या प्रकारच्या भावना या असतातच. त्यामुळे मुलांनाही त्यांच्या मनावरचं ओझं रडून मोकळं करू द्या.
किशोरवयीन मुलांना शारीरिक हिंसेपासून दूर राहण्याचं महत्वही समजवा. विनम्र राहणं आयुष्यासाठी किती गरजेचं आहे हे त्यांना समजवा.
या वयात मुलांना महिलांचा सन्मान करायलाही शिकवा. महिलांशी बोलताना ते कोणत्या शब्दात बोलू शकतात याबद्दल त्यांना शिकवा.