जाहिरात
मराठी बातम्या / देश / ...तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य

...तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य

...तर येत्या 24 तासांत होणार जगाचा अंत? नासाने सांगितलं काय आहे सत्य

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल : भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोरोनामुळे दिवसेंदिवत मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. या सगळ्यात आणखी एक खगोलशास्त्रीय घटनेने लोक घाबरले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यात असा दावा केला जात आहे की, 29 एप्रिलपर्यंत जगाचा विनाश होणार आहे. या बातम्यांचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे. का केला जात आहे दावा? अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. असंही सांगितलं जात आहे की, हा लघूग्रह पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखराहूनही मोठा आहे. या उल्केचा वेग हा 31,319 किलोमिटर प्रतितास इतका आहे. म्हणजे जवळपास 8.72 किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने येत आहे. वाचा- अंत्यसंस्कार केल्यानंतर सापडली महिला, रुग्णालयातूनच केला घरी फोन आणि…

जाहिरात

वाचा- थरारक VIDEO: …आणि 15 सेकंदात घरावर कोसळला BSNL चा टॉवर, पावसानेही झोडपलं काय आहे सत्य? अर्थात, 29 एप्रिल रोजी, एक प्रचंड उल्का पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. नासाच्या मते, सुमारे 2 हजार फूट क्षेत्रासह जेओ 25 नावाचे एक उल्का भूमीपासून 1.8 दशलक्ष किमी अंतरावर जाईल. गेल्या 400 वर्षात किंवा येत्या 500 वर्षात इतक्या जवळून कोणताच उल्का गेला नाही आहे. नासाने असेही म्हटले आहे की, हा उल्का चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 4 पट जास्त वाढेल. मात्र या हा उल्का पृथ्वीला स्पर्श करणार नाही आहे. 2013 मध्ये जवळपास 20 मिटर रूंद अशी एक उल्का पृथ्वीच्या कक्षेत आदळली होती. तर एक 40 मिटरची उल्का 1908 मध्ये सायबेरियाच्या कक्षेत आदळली होती. या उल्कापासून पृथ्वीवर कोणताही धोका असणार नाही. त्यामुळे, या अफवांवर विश्वास ठेवू नका. **वाचा-** भारतात ‘ही’ दोन औषधं देत आहेत कोरोनाला टक्कर, डॉक्टरांची आशा वाढली

सावधगिरी बाळगा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या खोट्या आहेत. त्यामुळे तुम्हीही यावर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता पडताळून घ्या. तसेच, तुम्ही असे मेसेज कोणालाही फॉरवर्ड करू नका, यामुळं समाजात अशांतता पसरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nasa
  • First Published :
जाहिरात
जाहिरात