नवी दिल्ली 27 एप्रिल: जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर सध्या औषध सापडलं नाही त्यामुळे सर्व जगच चिंतेत आहे. त्यावर संशोधन सुरू आहे आणि काही औषधं सापडलीत असं सांगितलं जात आहे. मात्र ते औषध यायला अजुन वेळ आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर कोरोनाविरुद्ध करण्यात येत आहे. या प्रयोगामध्ये भारतात दोन औषधांचा चांगला परिणाम दिसून आल्याचं मत याविषयाव सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सनं व्यक्त केलंय. देशातल्या काही तज्ज्ञ डॉक्टरांचा मिळून हा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून औषधोपचारीची दिशा ठरवणं आणि त्यात बदल सुचवण्याचं काम त्याला देण्यात आलंय.
भारत मुख्य उत्पादक देश असलेल्या Hydroxchloroquine या औषधाचा उपयोग जगातले अनेक देश करत आहेत. त्यात अमेरिका आघाडीवर आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्याबाबत भारताचे जाहीर आभारही मानले आहेत. कारण भारताने त्या औषधाचा पुरवढा अमेरिकेसहीत अनेक देशांना केला होता.
भारतात मात्र Favipiravir आणि Tocilizumab ही औषधं जास्त परिणामकारक ठरल्याचं मत या टास्क फोर्समधल्या डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. भारतात जे काही प्रयोग केले गेले त्यात ही दोन औषधं प्रभावी ठरल्याचं आढळलं. तर इतर काही देशांमध्ये Hydroxchloroquine हे औषध परिणामकारक ठरलं. या औषधाची शिफारस ICMRने केली होती.
हे वाचा - सावधान! भारतात जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा होऊ शकतो करोनाचा उद्रेक
प्रत्येक देशात वेगवेगळी अनुभव येत असून कुठल्याही एका निष्कर्षांवर आत्ताच येता येणार नाही असं मत डॉ. प्रिया नागराज यांनी व्यक्त केलं.
सध्या विविध 19 औषधांचा प्रयोग उपचारांमध्ये सुरू आहे. ही औषधं आहेत. Chlroquine, HCQ, Remdesivir, Lopinavir/Ritonavir, Baloxavir Marboxil, Darunavir, Ribavirin+IFN betam Galidesivir, Oseltamivir, Umifenovir, Camostat mesylate, Ruxolitinib, Interferon beta, Tocolizumab, Ustekinumab, Nigericin, Teicoplanin आणि Ivermectin अशी माहिती त्यांनी दिली.
हे वाचा -
'वर्षभरात लस येईपर्यंत Corona सामान्य तापासारखा होईल', शास्त्रज्ञांचा अंदाज
घरी जाताना भावुक झाले तबलिगी; म्हणाले, डॉक्टरांनी आई-बापाप्रमाणे घेतली काळजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus