Home /News /maharashtra /

थरारक VIDEO: …आणि 15 सेकंदात घरावर कोसळला BSNL चा टॉवर, पावसानेही झोडपलं

थरारक VIDEO: …आणि 15 सेकंदात घरावर कोसळला BSNL चा टॉवर, पावसानेही झोडपलं

28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वारासह पावसाचा अंदाज भागात वेधशाळेनं वर्तवंला आहे.

गडचिरोली 27 एप्रिल: राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाच दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं. सोसाट्याचा वारा, वादळ आणि पावसामुळे काही तास वातावरण पूर्ण बदलून गेलं. वादळी वाऱ्यामुळे कुरखेडा इथं BSNLचा उंच टॉवरच 15 सेकंदांमध्ये घरांवर पडला. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. या भागात BSNL हेच संपर्काचं ऐकमेव माध्यम आहे. आता टॉवरच पडल्याने दूरध्वीनी सेवा विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात डॉ. अभय बंग यांच्या सर्च संस्थेमधील अनेक झाडे उन्मळून पडली. सर्च संस्थेचा संपूर्ण परिसर हा झाडांनी वेढलेला आहे. अनेक झाडे उंच वाढली आहे. पण आज झालेल्या वादळाचा तडाखा या झाडांना बसला. यात मोठ मोठी झाडे मोडून पडली तर काही रस्त्यावर उन्मळून पडली. झाडांच्या मोठ्या फांद्या विजेच्या खांबावर ओढल्याने खांबही वाकले. मात्र जिवीत हानी झाली नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट असताना आणखी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्यात 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वारासह पावसाचा अंदाज भागात वेधशाळेनं वर्तवंला आहे. वादळी वारा आणि जोरदार पावसामुळे आंबा आणि द्राक्ष फळाचे मोठं नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा..मुंबईत लपलेल्या 11 तबलिगींच्या मुसक्या आवळल्या, धक्कादायक माहिती आली समोर मराठवाडा आणि विदर्भात काही भागात तुरळक तर काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा शक्यता आहे. कोकणाचा काही भाग आणि गोव्यात तूरळक पावसाचा अंदाज आहे. पुण्यात तीन दिवसाचे... पुण्यातही तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 28, 29 आणि 30 तारखेला मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. हेही वाचा.. 48 तासांत कोरोनामुळे 3 सहकारी गमावल्याचं ऐकून पोलिस अधिकाऱ्याला रडू कोसळलं 1 मे रोजी चक्रीवादळ उठणार... राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असताना स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. एक मेरोजी चक्रीवादळ उठणार असल्याचा अंदाज आहे. सध्या हे वादळ तयार झालं असून बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या समुद्रात आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे ढग गोळा होणार आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या