कानपूर, 09 फेब्रुवारी: प्रेमासाठी वाटेल ते करायला तरुण-तरुणी तयार असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लग्न करण्यास नकार दिल्यामुळे एक तरुणी तब्बल 250 किलोमीटर दूर तरुणाच्या घरी पोहचली. पण तरीही तरुणाने लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूर देहातमध्ये ही घटना घडली आहे. फेसबुकच्या माध्यमातून एका तरुण आणि तरुणीची ओळख झाली. बरेच दिवस दोघांमध्ये बोलणं सुरु होते. सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवरुन सुरु झालेल्या त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रमात झाले. तरुणाने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले होते. पण नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि आपला मोबाईल बंद केला. तरुणाच्या या वागण्यामुळे तरुणी नाराज झाली. त्याला भेटण्यासाठी लखीमपूर खीरीपासून जवळपास 250 किलोमीटर दूर त्याचे घर असलेल्या कानपूर देहात येथे ती पोहचली. पण तरी देखील तरुणाने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने थेट मंगलपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणाविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. (हे वाचा- Valentine Week: कार्तिक आर्यनला मिळालं खास गिफ्ट, VIDEO VIRAL ) मिळालेल्या माहितीनुसार, मंगलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाची एका वर्षापूर्वी फेसबुकवरुन लखीमपूर खीरी येथे राहणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. तरुणीने सांगितले की, ‘सुरुवातीला आमचे बोलणं व्हायचे. त्यानंतर आमच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आम्ही दोघांनी एकमेंकांना लग्न करण्याचे आश्वासन दिले. पण तरुणाने माघार घेत लग्नाला नकार दिला. त्यानंतर रविवारी मी त्याच्या घरी गेली पण त्यांचा नकार कायम होता.’ (हे वाचा- सैन्यातील जवान जिंकतोय भारतीयांची मनं, ड्रम्स वाजवतानाचा VIDEO VIRAL ) तरुणीने यानंतर थेट मंगलपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाच्या घरी धाव घेत त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची समजूत काढून तिला घरी पाठवले. एसआय उमेशचंद्र यांनी सांगितले की, ‘हे प्रेम प्रकरण आहे. आरोपीची चौकशी सुरु आहे. तरुणीच्या घरच्यांशी संपर्क करुन तिला घरी पाठवले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सध्या दोन्ही कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.