• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • भारतीय सैन्यातील जवानाची कला पाहून व्हाल चकित, ड्रम्स वाजवतानाचा VIDEO VIRAL

भारतीय सैन्यातील जवानाची कला पाहून व्हाल चकित, ड्रम्स वाजवतानाचा VIDEO VIRAL

भारतीय लष्करातील जवान सॅम डॅनियल ड्रम्स(Drums) वाजवतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत असून त्यांच्या या कलेचं कौतुकही होत आहे.

  • Share this:
मुंबई 9 फेब्रुवारी : भारतात अनेक कौशल्यवान व्यक्ती आहेत. गेल्या 20 वर्षांत कौशल्यवान लोकांना महत्त्वाचं व्यासपीठ मिळालं ते म्हणजे टीव्हीवरच्या रिअॅलिटी शोंचं. सुरुवातीला गायन, नृत्य यांचे रिअॅलिटी शो आले आणि नंतर शारीरिक कसरतींपासून अनेक कलांचा संगम असलेल्या कलाकृतींचं सादरीकरण या शोंमध्ये करता येऊ लागलं. कधीकाळी शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, कलांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्यांचा मार खावा लागत होता. आता आई वडिलच मुलांना या इतर कलांचे क्लास लावताना दिसत आहेत. या कलांचं कौतुक अशासाठी की रिअॅलिटी शोनंतर मोठं व्यासपीठ म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की त्या माणसाला प्रचंड प्रसिद्धी मिळते. सध्या असंच काहीसं घडतंय भारतीय लष्करातील जवान सॅम डॅनियल याच्या आयुष्यात. याबद्दलची बातमी टाइम्स नाऊ वेबसाइटने दिली आहे. सेनेतील जवान सीमेवर आपलं संरक्षण करतातच पण त्यांच्या अंगात इतरही अनेक कलागुण असतात. त्यांचं शौर्य, अतुलनीय त्याग याबद्दल आपल्याला माहिती असतं. पण त्यांच्या कलांबद्दल क्वचितच आपल्याला माहिती असतं. सॅम डॅनियलने ड्रम्स हे वाद्य वाजवलं असून त्याच्या या सादरीकरणाचा एक व्हिडीओ 'Soldierathon'या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये सॅम अगदी सहजपणे, प्रचंड वेगाने सूरतालयुक्त संगीताची बहार उडवून देताना दिसतोय. त्याचं वादन ऐकून कुणीही अवाक होईल. एखाद्या प्रोफेशनल ड्रमरसारखंच सॅमचं वादन आहे, त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर वाजवता वाजवता ड्रम्सस्टीक्स हवेत उडवून त्या जमिनीवर न पडू देता पुन्हा झेलण्याची किमयाही तो साधत आहे. त्यामुळे हे वादन ऐकण्याबरोबरच देखणंही झालं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिलाच पाहिजे. "Super talented Indian soldier Sam Daniel," असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकाउंटला टॅग करण्यात आलं आहे. कॅप्शनच्या शेवटी जय हिंद लिहिलंय. आतापर्यंत या व्हिडिओला 59.8 हजार व्ह्यूज मिळाले असून, 1.8 हजार वेळा ते रिट्विट झालं आहे. 7.6 हजार जणांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तर, 78 जणांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. वाह काय अप्रतिम वादन, ग्रेट टॅलेंट, मजा आ गया, जय हिंद अशा प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का? नसेल तर नक्की पाहा.
Published by:Kiran Pharate
First published: