• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला FB मित्राने मुलाखतीच्या नावाने बोलावलं आणि केला बलात्कार

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला FB मित्राने मुलाखतीच्या नावाने बोलावलं आणि केला बलात्कार

Facebook friend raped on girlfriend: दोघांमध्ये जवळपास दोन महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : एका 19 वर्षीय मुलीवर फेसबूकवरील मित्राने (Facebook friend) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वाल्हेर येथे ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही पोलीस भरतीची (Police recruitment) तयारी करत होती. नोकरीसाठी मुलाखतीच्या बहाण्याने मित्रने तिला बोलावले आणि मग एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार (rape) केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बलात्कार करुन बनवला व्हिडीओ फेसबूक वरील मित्राने पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या 19 वर्षीय मुलीला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावले. त्यानंतर कोल्ड ड्रिकमध्ये गुंगीचं औषध दिलं. ज्यावेळी पीडित मुलगी बेशुद्ध झाली तेव्हा तिच्यावर मित्राने वारंवार बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्कार करत असताना त्याचा व्हिडीओ सुद्धा बनवला. आरोपी मुलगा हा शोपूर येथील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी झाली होती मैत्री मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा यांच्यात दोन महिन्यांपूर्वी मैत्री झाली होती. आपल्या तक्रारीत पीडित मुलीने म्हटले की, आरोपीने तिला नोकरीसाठी मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेर येथे बोलवलं. त्यानंतर तो मला घेऊन बहोडापूर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. मग कोल्ड ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध मिसळून मला पाजलं. जेव्हा मी बेशुद्ध झाली तेव्हा माझ्यावर बलात्कार केला आणि व्हिडीओ सुद्धा शूट केला. वाचा : बाथरुममध्ये छुपा कॅमेरा पाहून हादरली महिला, 3 वर्षांपासून प्लंबरचा सुरू होता घृणास्पद प्रकार बलात्कार केल्यावर आरोपीने पीडित मुलीचे सर्व कागदपत्रे, सर्टिफिकेट्स आपल्या जवळच ठेवले. या घटनेनंतर रविवारी आरोपीने कागदपत्रे पुन्हा देण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलवलं आणि मग पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. तरुणीवर बलात्कार करुन तिला रस्त्यावर सोडून निघून गेला. यानंतर पीडित मुलीने 100 क्रामांवकर फोन करुन पोलिसांची मदत मागितली. पोलिसांत दाखल कऱण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वी आरोपी तरुणाने पीडित मुलीला फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांत मैत्री झाली आणि मग ते एकमेकांसोबत फोनवर बोलू लागले. याच दरम्यान तरुणीने आपल्याला चांगली नोकरी हवी असल्याचं मुलाला सांगितलं. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी आरोपीने नोकरीसाठी मुलाखतीच्या बहाण्याने ग्वाल्हेर येथे बोलावलं. त्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. वाचा : सोशल मीडियातील चर्चेला बळी पडून मुंबईतील मुलानं गाठला गोवा; मोबाइलमधून भलताच प्रकार उघड पीडित मुलीने तक्रारीत म्हटले, आरोपीने माझे कागदपत्रे आपल्याकडेच ठेवले होते. ते पुन्हा घेण्यासाठी मला बोलावले. ज्यावेळी मी कागदपत्रे घेण्यासाठी गेली तेव्हा त्याने पुन्हा बलात्कार केला. या घटनेनंतर बहोडापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन आरोपीच्या शोधासाठी टीम रवाना केली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: