मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सोशल मीडियातील चर्चेला बळी पडून मुंबईतील मुलानं गाठला गोवा; मोबाइलमधून भलताच प्रकार उघड

सोशल मीडियातील चर्चेला बळी पडून मुंबईतील मुलानं गाठला गोवा; मोबाइलमधून भलताच प्रकार उघड

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Mumbai: सोशल मीडियावरील एका ग्रुपमधील चर्चेला बळी पडून बदलापूर येथील एक 13 वर्षांच्या मुलाने थेट गोव्याला पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

बदलापूर, 03 ऑक्टोबर: सोशल मीडियावरील एका ग्रुपमधील चर्चेला बळी पडून बदलापूर येथील एक 13 वर्षांच्या मुलाने थेट गोव्याला पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'वर्षभराने परत येतो' असं सांगून संबंधित मुलगा घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्यानं संबंधित मुलाच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत मुलाला शोधून काढलं आहे.

बदलापूर येथील रहिवासी असणारा 13 वर्षीय मुलगा थेट गोव्यात आढळल्यामुळे पोलीसही हादरले आहेत. बदलापूर पोलिसांनी सोमवारी संबंधित मुलाला ताब्यात घेतलं आहे. संबंधित मुलाने सोशल मीडियावरील एका ग्रुपमधील चर्चेला बळी पडून तो गोव्याला गेल्याचं प्राथमिक तपासात समोर आली आहे. पण मुलाचं अपहरण झालं असावं, असा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत.

हेही वाचा-4दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेसोबत घडलं विपरीत;भयावह अवस्थेत आढळली महिला

संबंधित 13 वर्षीय मुलगा बदलापूर शहरातील पूर्व भागातील रहिवासी आहे. संबंधित मुलगा रविवारी 'वर्षभराने घरी परत येतो' असं सांगून घराबाहेर पडला होता. तो मस्करी करत असावा, असं घरच्यांना वाटलं. पण तो रात्री उशिरापर्यंत खरोखर घरी आला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. दरम्यान पोलीस तपास करत असताना त्यांना 'डिस्कॉर्ट' या ऑनलाइन संकेतस्थळाची माहिती मिळाली. या संकेतस्थळावर 'रनअवे अँड गेट अ लाइफ' नावाचा ग्रुप आढळला.

हेही वाचा-'तुझा संसार होऊ देणार नाही', लग्न 8 दिवसांवर आलेल्या तरुणाचं धक्कादायक पाऊल

या ग्रुपमध्ये घरातून पळून जाण्याबाबत चर्चा केली जात होती. तसेच घरातून पळून जाण्यासाठी विविध प्लॅन देखील येथे आखले जात होते. याच चर्चेला बळी पडून संबंधित मुलगा गोव्याला पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत मुलाचा शोध घेतला आहे. संबंधित मुलगा गोव्यातील कलंगुट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोव्याला जाऊन मुलाला ताब्यात घेतलं आहे. संबंधित मुलाचं अपहरण झालं असावं, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai