नवी दिल्ली, 26 मे : आतापर्यंत लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीने फार काळ एकत्र राहणे असा मानला जात होता. मात्र लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नवी परिभाषा ठरविताना पंजाब आणि हरियाणा कोर्टाने म्हटले आहे की प्रियकर आणि प्रेयसी दोन दिवस जरी एकत्र राहिले तरी ते लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणून मोजले जाईल. एका मुलाने आपल्या जोडीदारास तिच्या पालकांकडून ताब्यात द्यावयाची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना हायकोर्टाच्या खंडपीठाने हे सांगितले. यापूर्वी न्यायालयाच्या एकच खंडपीठासमोर याचिकाकर्त्याने अशी विनंती केली होती की, जेव्हा प्रेयसीचे कुटुंबीय तिला जबरदस्तीने त्याच्यापासून दूर नेत होते, तेव्हा आपण प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. आधीच्या खंडपीठाने असे म्हटले होते की, ही तरुणी त्याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती याचा पुरावा मिळालेला नाही आणि त्यात सामील महिलेची बदनामी करण्याचे उद्दीष्ट आहे. दंड म्हणून महिलेला एक लाख रुपये देण्याचे आदेशही एका खंडपीठाने दिले होते. त्यानंतर याचिकाकर्त्याने एकल खंडपीठाच्या आदेशांना विभागीय खंडपीठासमोर आव्हान दिले, ज्यात एक लाख रुपयांचा दंड माफ केला. खंडपीठाने मात्र मुलीला ताब्यात देण्याची विनंती मान्य केली नाही. कारण तरुण केवळ 20 वर्षांची आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, 21 वर्षांची होण्यापूर्वी मुलाचे लग्न होऊ शकत नाही. हे वाचा - स्वागताला थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर-मास्क वेलकम गिफ्ट; कोरोनातील लग्नाचा थाट GOOD NEWS : पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला बाळाला जन्म ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यजनक पोस्ट लिहून संपवलं जीवन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.