GOOD NEWS : पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला बाळाला जन्म

GOOD NEWS : पुण्यात कोरोनाबाधित महिलेने दिला बाळाला जन्म

पुणे शहर आणि जिल्ह्यातील स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अशातच पुण्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 26 मे : वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अशातच पुण्यातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. 'कोरोनाबाधित असलेल्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. आनंदाची बाब म्हणजे हे बाळ कोरोनामुक्त आहे. बाळाची तब्बेत ठणठणीत असून पुणे महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती करण्यात आली.

'महापालिकेचे सोनावणे रुग्णालय हे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी खास राखून ठेवलेले रुग्णालय आहे. यात गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जात आहे. सोनवणे रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि राबणाऱ्या प्रत्येक घटकाचे पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद,' अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यात अचानक बंद केले जात आहेत रस्ते

एकीकडे 97 टक्के पुणे खुले झाले. पत्रे,बांबू ठोकून बंद केलेले गल्लीबोळ ,रस्ते खुले केले गेले. मात्र अजूनही अचानक रस्ते बंदही केले जात आहेत. प्रशासनाने तंबी देऊनही असे प्रकार होत असल्यामुळे स्थानिक रहिवासी, बाहेरून ये-जा करणारे लोक यांचे हाल होत असल्याचं चित्र आहे. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरून निलायम टॉकीजकडे जाणारा रस्ता अचानक बंद करण्यात आला. यामुळे हातावर पोट असणारे लोक वैतागले असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातून आता नवी मागणी

पुण्यात ज्या पद्धतीने इतर आस्थापनांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलीय त्याच धर्तीवर आता कोर्टाच्या दैनदिन कामकाजालाही सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड मिलिंद पवार यांनी केली आहे. र्टाचे रूटिन कामकाज पुन्हा सुरू करताना सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी पाहिजे तर सुप्रीम कोर्टाने नियम घालून द्यावेत. पण कामकाज सुरू करावे. कारण लॉकडाऊनमुळे जुनिअर्स वकिलांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असंही मिलिंद पवार यांनी म्हटलं आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं