'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, सोशल मीडियावर नैराश्यजनक पोस्ट लिहून संपवलं जीवन

'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, सोशल मीडियावर नैराश्यजनक पोस्ट लिहून संपवलं जीवन

क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली.

  • Share this:

मुंबई, 26 मे : मागच्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातून एका मागोमाग एक निधनवार्ता येतच आहेत. अशात आता आणखी एका अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. क्राइम पेट्रोल फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं तिच्या इंदौरमधील घरी गळफास घेत आत्महत्या केली. कोरोना व्हायरच्या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षा तिच्या घरी आली होती. प्रेक्षाच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र डिप्रेशनमुळे प्रेक्षानं आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरी एक निराशजनक पोस्ट लिहिली होती.

प्रेक्षा मेहतानं क्राइम पेट्रोल दस्तकच्या काही एपिसोडमध्ये काम केलं होतं. पण लॉकडाऊनमध्ये ती तिच्या इंदौरच्या बजरंग नगरमधील घरी परतली होती. याच ठिकाणी तिनं गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री तिनं गळफास घेतला. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरीही ती मागच्या काही दिवसांपासून तणावग्रस्त होती असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

Make it simple, but significant 😎 #behenkishaadi #smile

A post shared by Preksha Mehta 🎭 (@iamprekshamehta) on

प्रेक्षा आपल्या घरी परतल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती. सोमवारी रात्री ती जेव्हा तिच्या रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ ती तिचा फोन वापरत राहिली. त्यानंतर तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निराशजनक स्टेटस अपलोड केलं होतं. ज्यात तिनं लिहिलं, 'सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरून जाणं' सकाळी जेव्हा प्रेक्षाचे बाबा तिला उठवायला तिच्या रुममध्ये गेले त्यावेळी त्यांनी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तिला लगेच रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

प्रेक्षाला अभिनेत्री व्हायचं असल्यानं ती मुंबईत आली होती मात्र लॉकडाऊन केल्यानंतर ती तिच्या घरी परतली. त्यानंतर लॉकडाऊन वाढत गेलं आणि आता आपल्याला पुढे काम मिळणार नाही या भावनेनं ती डिप्रेशनमध्ये जात होती आणि डिप्रेशनमध्येच तिनं हे धक्कादायक पाऊल उचलल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. दरम्यान पोलीस तपासात तिची कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही.

...जेव्हा जखमी वरुणचा बाबा डेव्हिड धवन यांनी सेटवर सर्वांदेखत केला अपमान

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणानं सोनू सूदकडे मागितली मदत, मिळालं धम्माल उत्तर

First published: May 26, 2020, 6:18 PM IST
Tags: tv actress

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading