स्वागताला थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर-मास्क वेलकम गिफ्ट; कोरोना काळातील लग्नसोहळ्याचा थाट

स्वागताला थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर-मास्क वेलकम गिफ्ट; कोरोना काळातील लग्नसोहळ्याचा थाट

कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) परिस्थितीत गरजेनुसार खूप काही बदल झालेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : हॉल, कॅटरिंग, फ्लॉवर डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ, फ्लोरल रंगोली डेकोरेशन, ब्रायडल मेकअप अँड ज्वेलरी, पुष्पहार, पंडित आणि हो थर्मल स्क्रिनिंग, यूव्ही हँड सॅनिटायझेशन, एन-९५ मास्क.... कोरोना काळातील हे वेडिंग पॅकेज (wedding package). कोरोनाने (coronavirus) शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे.

शाही लग्न म्हटलं की त्यासाठी काय काय हवं याची भली मोठी लिस्ट आलीच. मात्र कोरोनामुळे आता अशा लग्नसोहळ्याचा थाट बदलला आहे. वेडिंग पॅकेजमध्ये आता सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्क्रिनिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. किंबहुना आता याच गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत.

कोरोनामुळे काही जणांनी आपल्या घरातील लग्नसोहळा पुढच्या वर्षी ढकलला आहे. तर काही जणांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती तो उरकण्याचा निर्णय घेतल्या आणि इतर व्यवसायांप्रमाणे वेडिंग मॅनेजमेंटच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता वेडिंग मॅनेजमेंट कंपन्यांनी परिस्थितीनुसार आपल्या वेडिंग पॅकेजमध्ये बदल केलेत.

बंगळुरूतील पन्नगा या इवेंट कंपनीची ही जाहिरात पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच.

कंपनीच्या सीईओ पन्नगा श्रीनिवासालू म्हणाले, "अनेक लोकांनी आपले लग्न 2021 पर्यंत पुढे ढकलं आहे. काही जणांना त्यांच्या घरातच लग्न करायचं आहे. काही जणांना टेरेसवर लग्न करायचं आहे. त्यामुळे सध्याचा गरजेनुसार आम्हीदेखील बदल केलेत. लोकांनाही ते समजू शकतं"

हैदराबादमधील इवेंट हाऊज कंपनीने तर यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यांनी कडल कर्टनही ऑफर केलेत. शिवाय ई-इनव्हिटेशन कार्ड डिझायनिंग आणि लग्नाच्या वेब टेलिकास्टची सोयही उपलब्ध केली आहे.

कोरोनामुळे व्यवसायांवरही संकट आलं आहे. केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यातून लोकांची गरज लक्षात घेत इवेंट कंपन्यांनी आपले वेडिंग पॅकेज तयार केलेत. त्यातून त्यांचीही गरज भागत आहे.

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये झाला जुळ्या मुलांचा जन्म, आईने अशी ठेवली कोरोनावरून नावं

अशाच पद्धतीनं इतर व्यावसायिकही कोरोनाच्या कठिण परिस्थितीत आपल्या व्यवसायासाठी मार्ग शोधत आहेत. काही दिवसांपूर्वीच बेळगावातील एका सोनारानं चांदीचा मास्क तयार केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरील बेळगावात राहणारे सोनार संदीप सागाओंकर यांनी हा चांदीचा मास्क बनवणं सुरू केलं आहे. खरंतर लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यापार ठप्प झाला होता. त्यात मास्कची गरज पाहून त्यांनी त्या दिशेनं आपला व्यापार पुन्हा सुरू केला. लॉकडाऊनमध्ये होत असेल्या लग्नांसाठी त्यांनी चांदीचा फेस मास्क तयार केला आहे आणि या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ, मात्र या 2 गोष्टी भारतासाठी जमेच्या

संकलन, संपादन - प्रिया लाड

कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं

First published: May 26, 2020, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading