मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी प्रयत्न आणखी वेगात करा' राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला आदेश

'कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी प्रयत्न आणखी वेगात करा' राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला आदेश

जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूंची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत आता शोध घेतला जात आहे. अमेरिका देखील याबाबत संशोधन करत असून, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूंची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत आता शोध घेतला जात आहे. अमेरिका देखील याबाबत संशोधन करत असून, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूंची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत आता शोध घेतला जात आहे. अमेरिका देखील याबाबत संशोधन करत असून, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

पुढे वाचा ...

  वॉशिंग्टन, अमेरिका, 27 मे: कोविड -19 या महामारीचं मूळ शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वेगात करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना (Intelligence System) बुधवारी दिले. चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली असावी, असा अनेक देशांचा कयास आहे. त्या अनुषंगाने अनेक देश याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास करत आहेत. यासाठी मध्यंतरी तज्ज्ञांच्या एका पथकाने वुहान येथील प्रयोगशाळेला भेट देत पाहाणी देखील केली होती. परंतु, कोरोनाच्या उत्पत्तीबाबत (Covid-19) ठोस पुरावे अजूनही हाती आलेले नाहीत.

  कोरोनामुळे जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडाला. जगातील लाखो नागरिकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले. तसंच लॉकडाऊनसारखे (Lockdown) कठोर निर्बंध लावावे लागले. भारतात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला. परिणामी, आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आणि या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. एकूणच जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूंची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत आता शोध घेतला जात आहे. अमेरिका देखील याबाबत संशोधन करत असून, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

  कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्राण्याचा मानवाशी संपर्क आला का? किंवा प्रयोगशाळेत काही दुर्घटना घडली होती का? आदी निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यक पुरावे अद्यापही पुरेशा प्रमाणात हाती आले नसल्याचं बायडेन यांनी यावेळी सांगितलं.

  (वाचा - मानवी शरीरावर आधीपासूनच आहे अगणित फंगसचं वास्तव्य, आढळतात 80 प्रकारच्या बुरशी)

  बहुतांश गुप्तचर यंत्रणांना आपल्याकडे असलेली माहिती ही पुरेशी आहे, असं वाटत असतं. परंतु, आपल्याकडे दुसऱ्यापेक्षा अधिक माहिती असणं आवश्यक असल्याचं, बायडेन यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यावेळी बायडेन यांनी अमेरिकेतील राष्ट्रीय प्रयोगशाळांना या तपासणीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसंच चीनमधून (China) या रोगाची उत्पत्ती कशी झाली, तसंच या मागे काय उदिदष्टं होती, याबाबतच्या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं.

  संपूर्ण पारदर्शकता तसंच पुरावे आधारित आंतरराष्ट्रीय अन्वेषणात, संशोधनात सहभागी होण्यासाठी आणि सर्व संबधित डेटा आणि पुरावे देण्यासाठी चीनवर दबाव टाकण्याकरता अमेरिका जगभरातील समविचारी देशांसोबत काम करत राहिल, असं बायडेन यांनी स्पष्ट केलं.

  (वाचा - हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी किती हवं सोशल डिस्टन्सिंग?)

  आंतरराष्ट्रीय तपासात (International Investigation) चीन सरकारने पूर्ण सहकार्य करण्यास नकार दिला, तर ठोस निष्कर्ष कधीच कळू शकणार नाही, अशी शक्यता देखील जो बायडेन यांनी व्यक्त केली. सुरुवातीच्या काही महिन्यात आमच्या निरीक्षकांना तपासाच्या स्तरावर कोरोनाच्या उत्पत्तीविषयी कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याने तपासात सातत्याने अडथळे येत असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं.

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Joe biden, President of america, United States of America