रविंद्र कुमार, प्रतिनिधी झुंझुनू, 25 जुलै : सुकामेवा आपल्या सर्वांनाच आवडतो. काजू, बदाम, पिस्ता छानच लागतात पण खारीक, खजुराची तर गोष्टच वेगळी. मऊ, लुसलुशीत, गोड खजूर खायला कोणाला नाही आवडत…परंतु तुम्हाला माहितीये का, आपण जे खजूर खातो ते सुरुवातीपासून तसे नसतात. खजुराच्या झाडाला सर्वात आधी पिवळ्या रंगाची फळं येतात. ही फळं पिकल्यावर त्यांचा रंग बदलतो आणि मग त्यांना आपण खातो. पिकलेल्या खजुरांप्रमाणेच कच्चे खजूरदेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. नैसर्गिक पद्धतीने प्रसूती व्हावी, यासाठी गरोदरपणात ही फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. खजूर हे झाडापासून कच्चे उपटले जातात. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत काही आठवड्यांआधी त्यांची कापणी केली जाते. त्यानंतर त्यांना उन्हात सुकवलं जातं. खजूर पूर्णपणे पिकल्यावर त्यांचा रंग बदलतो. त्यांची चवदेखील बदलू लागते. खरंतर खजूर जसजसे पिकतात तसतसे अधिक मऊ आणि रसदार होतात. राजस्थानच्या झुंझुनू बाजारात सध्या खजुराच्या कच्च्या फळांचा भाव 100 ते 120 रुपये किलो इतका आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमलता ढाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या खजूर फळात फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. हे फळ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, केसांचा पोत सुधारतो, शिवाय नैसर्गिक पद्धतीने प्रसूती व्हावी यासाठीदेखील ही फळं फायदेशीर ठरतात. या फळांमुळे शरीराला पुरेसं फायबर मिळाल्याने आतडे मजबूत होतात. बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होतं. तसंच शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. परिणामी हृदयासंबंधित आजारही कमी होतात. खजुरामुळे पावसाळ्यात त्वचेचा तुकतुकीतपणा कायम राहतो.
कधी चॅाकलेट मोमो खाल्लाय का? एक नव्हे आहेत 50 प्रकार, पुण्यातला पाहा हा VIDEO
डॉक्टरांच्या माहितीनुसार, महिलांच्या शरीरात साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा कमी, अधिक असेल तर त्यांनी कच्च खजूर खावं. गरोदरपणात नवव्या महिन्यात दररोज खजूर खाल्ल्यास बाळ कोणत्याही शस्त्रक्रियेविना नैसर्गिक पद्धतीने जन्माला येण्याची शक्यता असते.
कच्च खजूर फळ.