मथुरा (उत्तर प्रदेश) 13 सप्टेंबर : सगळ्यात जवळचा व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला तर त्याचा सगळ्यात मोठा धक्का बसतो. यात एखाद्याचे प्राणही जाऊ शकतात. तर घरातील प्रेमाचा माणूस गमावल्याने धक्क्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेल्या बहिणीचा मृत्यू झाल्याच्या धक्क्याने महिलेचाही मृत्यू झालं. सगळ्यात खळबळजनक म्हणजे बहिणीच्या मृतदेहाशेजारी बसून रडतानाच या महिलेने प्राण गमावले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रामसिंग यांच्या दोन मुली आहेत. दोघींमध्ये 9 वर्षांचा फरक आहे. मोठी बहिण मोहन देवीचं लग्न चौमुहान गावच्या रहिवासी केशवदेवशी झालं होतं तर लहान बहिण शीला हीचंही त्याच कुटुंबात लग्न झालं होतं. त्यामुळे या दोघी बहिणाींच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. उत्तर प्रदेशच्या मथुरागावातील जैत या गावात हा प्रकार घडला आहे. इतर बातम्या - एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा, या पक्षातून मिळणार विधानसभा तिकीट 11 सप्टेंबरची घटना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन देवी हिचं दीर्घ आजारामुळे बुधवारी 11 सप्टेंबर रोजी निधन झालं. आपल्या मोठ्या बहिणीच्या मृत्यूने शीलाला मोठा धक्का बसला. तिने मोहन देवीच्या मृतदेहाला घट्ट मिठी मारली होती. पण जेव्हा तिच्या रडण्याचा आवाज बंद झाला तेव्हा तिचाही मृत्यू झाल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. दोन्ही बहिणींचे अंत्यसंस्कार एकत्र झाले इतर बातम्या - या काकूंनी केली ‘गलती से मिस्टेक’, VIDEO होतोय तुफान व्हायरल जेव्हा शीलाच्या रडण्याचा आवाज बराच वेळ आला नाही आणि ती तिथून हलली नाही तेव्हा लोकांना संशय आला. त्यानंतर कुटुंबीयांनी शीलाला उठवण्यास सुरुवात केली. पण तिने काहीही उत्तर दिलं नाही. पण बहिणीच्या जाण्याच्या धक्क्यात शीलाचाही मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर दोघींचीही एकत्र अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. VIDEO : मनसे निवडणूक लढवणार की नाही? बाळा नांदगावकर म्हणतात…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.