भगवंत मान यांनी एक दिवसापूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हा शपथविधी सोहळा भगतसिंग यांच्या गावी असलेल्या खटकर कलानमध्ये पार पडला. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्ली आपचे सर्व नेते उपस्थित होते. भगवंत मान पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. कार्यकाळानुसार ते पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री आहेत. मान हे संगरूरमधून दोन वेळा खासदारही राहिले आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. 117 जागांच्या पंजाबमध्ये 'आप'ने 92 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला 18, अकाली दलाला 3 आणि भाजपला 2 जागा मिळाल्या. 'आप'ने यावेळी भगवंत मान यांच्या तोंडावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागलं. त्यात नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांना आपली जागा वाचवता आली नाही.पंजाब की जनता के हित में आज एक बहुत बड़ा फ़ैसला लिया जाएगा। पंजाब के इतिहास में आज तक किसी ने ऐसा फैसला नहीं लिया होगा।
कुछ ही देर में एलान करूँगा...। — Bhagwant Mann (@BhagwantMann) March 17, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.