मराठी बातम्या /बातम्या /देश /

आता 200 किमी प्रतितास वेगाने धावणार Vande Bharat ट्रेन! वेग वाढवण्यासाठी ही आहे योजना

आता 200 किमी प्रतितास वेगाने धावणार Vande Bharat ट्रेन! वेग वाढवण्यासाठी ही आहे योजना

Vande Bharat Trains: वंदे भारत गाड्यांच्या (Vande Bharat Trains) उभारणीवर जलदगतीने काम करण्याची रणनीती रेल्वेने तयार केली आहे. यासोबतच वंदे भारत गाड्याही 200 किलोमीटरच्या वेगाने धावण्यासाठी अपग्रेड केल्या जात आहेत. या गाड्यांच्या अपग्रेडेशनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर हवेशी स्पर्धा करणाऱ्या या गाड्या जगाच्या रेल्वे व्यवस्थेला आव्हान देतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 17 मार्च : भारतीय रेल्वे (Indian Railways) आता मेड इन इंडिया (Made in India) या संकल्पनेवर वेगाने काम करत आहे. वंदे भारत Vande Bharat Trains) गाड्यांच्या उभारणीवर जलदगतीने काम करण्याची रणनीती रेल्वेने तयार केली आहे. यासोबतच वंदे भारत गाड्याही 200 किलोमीटरच्या वेगाने धावण्यासाठी अपग्रेड केल्या जात आहेत. या गाड्यांच्या अपग्रेडेशनमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या गाड्या आता हवेशी स्पर्धा करत जगाच्या रेल्वे व्यवस्थेसाठी आव्हान उभे करतील.

लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील (Railways Budget discussion in Lok Sabha) चर्चेदरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका खासदाराच्या प्रश्नांना लेखी उत्तरे देताना सांगितले की, परिस्थितीनुसार आपल्याला बदलावे लागेल. ते म्हणाले की, 2017 मध्ये आधुनिक ट्रेनचे काम सुरू झाले. यानंतर वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Train) 2019 मध्ये निर्मिती झाली. जगभरातील रेल्वे उद्योगाला हादरवून सोडणारी ही यशोगाथा आहे.

45 हजार लोकं, VVIP ची गर्दी; असा असेल योगी आदित्यनाथांचा शपथविधी सोहळा

अवघ्या 115 कोटींमध्ये ट्रेनची निर्मिती

रेल्वेमंत्र्यांनी वंदे भारत ट्रेनची खासियत आणि खर्चाबाबत सभागृहाला माहिती देताना असेही सांगितले की, देशाबाहेर बनवल्या जाणार्‍या ट्रेन्सबद्दल बोलायचे झाले तर एका ट्रेनच्या निर्मितीसाठी सुमारे 290 कोटी रुपये खर्च येतो. मात्र, वंदे भारत ट्रेनचा खर्च केवळ 110-115 कोटी इतकाच आला आहे. या कोणत्याही तांत्रिक बाबींमध्ये जगातील कोणत्याही ट्रेनच्या मागे नाही.

Aadhaar-PAN Link: 31 मार्चपर्यंत पूर्ण करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड

8 वंदे भारत गाड्या दर महिन्याला तयार होतील, उत्पादन युनिट अपग्रेड केलं जातंय

मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, आता बनवल्या जाणार्‍या पुढील श्रेणीच्या ट्रेनमध्ये एअर कुशन आहे, जेणेकरून प्रवास आरामदायी होईल. आता सप्टेंबर महिन्यापासून जेव्हा साखळी उत्पादन सुरू होईल, तेव्हा सुरुवातीला चार वंदे भारत गाड्या महिन्यात तयार होतील, त्यानंतर महिन्याला आठ गाड्यांची निर्मिती होईल. सर्व उत्पादन युनिट अपग्रेड केले जात आहेत.

तीन वर्षांत 400 गाड्यांचा संकल्प, परदेशातून आयात होणार नाही

या परिस्थितीत येत्या तीन वर्षांत 400 गाड्यांचा संकल्प पूर्ण होईल, असे मानले जात आहे. कोणत्याही गाड्या आयात करण्याची गरज नाही. वंदे भारत देखील 200 किमी आवृत्तीसाठी अपग्रेड केली जात आहे.

First published:

Tags: Train