नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमधील अहमदाबाद आणि उत्तर प्रदेशातील आग्र्याला ते भेट देतील. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड कुशनेर असणार आहेत. ट्रम्प यांचा दौऱा निश्चित झाल्यापासून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. अहमदाबादमध्ये ट्रम्प ज्या रस्त्याने येणार आहेत त्या रस्त्याकडेला भींती उभारण्यावरून ते स्वागतासाठी 70 लाख लोक उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेवरून वाद रंगला आहे. ट्रम्प यांच्या स्वागताला उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने ट्विट करताना म्हटलं की, मोदी सरकारमध्ये मोठी नोकरभरती होणार आहे. 69 लाख पदांसाठी असलेली ही भरती असून यात वेतन म्हणून अच्छे दिन मिळणार आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विटर हँडलवर एक पोस्टर पब्लिश केलं आहे. नोकरभरतीच्या जाहिरातीसारखं हे पोस्टर आहे. या पोस्टरवर म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती. ट्रम्प यांना पाहून हात हलवण्यासाठी नोकर भरती. पदांची संख्या 69 लाख, यासाठी वेतन म्हणून अच्छे दिन देण्यात येतील. 24 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता मोटेरा स्टेडियम. याशिवाय पोस्टच्या कॅप्शनमध्ये मोदींनी 2 कोटी रोजगार निर्मितीची घोषणा केली होती त्यापैकी 69 लाख नोकऱ्यांची भरती निघाली आहे लवकर अर्ज करा असंही म्हटलं आहे.
69 lakh vacancies of the 2 cr promised by Modiji have been announced. Apply now. Hurry! #Jumla7MillionKa pic.twitter.com/4jA27gQL16
— Congress (@INCIndia) February 22, 2020
डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबादला पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतील. ट्रम्प एअरपोर्टवरून मोटेरा स्टेडियमपर्यंत रोड शो करणार आहेत. जगातील सर्वा मोठ्या मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. वाचा : ‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड अहमदाबादमधून डोनाल्ड ट्रम्प आग्र्याला जाणार आहेत. ताजमहाल पाहिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यादिवशी दिल्लीत पंतप्रधान मोदींसह इतर पाहुण्यांची भेट घेणार आहेत. मेलानिया ट्रम्प दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये जातील. या भेटीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदीया यांना आमंत्रण न दिल्यानं टीका होत आहे. वाचा : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत असतो फुटबॉल, क्षणात करू शकतात जगाचा विध्वंस

)







