‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड

‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड

आयुष्मानच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट असतात जे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसतात. आणि असे काही कलाकारही असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातीलच एक म्हणेज अभिनेता आयुष्मान खुराना. आयुष्मानच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. आयुष्मान विविध धाटनीच्या भूमिका साकारत असतो. आणि त्याच्या या भूमिकांना चाहते भरभरून पसंती देत असतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या आयुष्मानच्या  ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या आर्टीकल 377 वर आधारित चित्रपटावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

नुकतच ब्रिटीश समाजसुधारक पीटर टैचेल यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यापोस्टमध्ये लिहिलं होतं की, ‘भारत : एक नवीन बॉलीवूड रोमँटीक कॉमेडी रिलीज झाली आहे. ज्यामध्ये गे रोमांस दाखवला गेला आहे. या चित्रपटातून जुन्या पिढीला समलैंगिकताबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ या पोस्टनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे.ट्रम्प यांनी ऑफिशयल ट्विटर हँडलवर पीटर टैचेल यांची ही पोस्ट रिट्वीट करून ‘Great!’ असं लिहिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट LGBT मुद्दा आणि त्याच्या अधिकारांना गांभीर्याने घेण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. ट्रम्प यांच रिट्विटवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया मिळत आहेत.

21 फेब्रुवारीला आयुष्मानचा शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 9.75 करोडची कमाई केली आहे. त्यामुळे आयुष्मानचा हा चित्रपट देखिल सुपरहिट होणार असल्याची चिन्ह आहेत.

First published: February 22, 2020, 12:46 PM IST

ताज्या बातम्या