जाहिरात
मराठी बातम्या / देश / डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये असेल हा 'खास मेन्यू'

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये असेल हा 'खास मेन्यू'

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये असेल हा 'खास मेन्यू'

डोनाल् ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांचा मेन्यू काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ते भारतीय जेवण जेवणार की अमेरिकन याचं सर्वांना कौतुक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

**नवी दिल्ली,22 फेब्रुवारी -**अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनार्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांना अहमदाबाद ते आग्रा ताजमहाल असा भरगच्च दौरा आहे. ट्रम्प या दौऱ्यात राहणार कुठे, खाणार काय त्यांची सुरक्षा कशी असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. तर डोनार्ड ट्रम्प हे दिल्लीतील सुप्रसिद्ध आणि शानदार असलेल्या आयटीसी मौर्य (ITC Maurya Hotel) हॉटेलमध्ये थांबणार आहेत. ट्रम्प यांच्या नावाची खास थाळी- या हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्या फक्त राहण्याचीच नाही तर खाण्यापिण्याचीही तितकीत जबरदस्त तयारी केली जात आहे. याच्यासाठी आयटीसी मौर्याच्या प्रसिद्ध बुखारा रेस्टॉरंटमध्ये खास मेनूही तयारी होणार आहेत. मागील 40 वर्षांपासून बुखाराचे मेन्यू तितकेच प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी ते बदलले सुद्धा नाहीत. ट्रम्प यांच्यासाठी खास ट्रम्प थाळीचाही समावेश आहे. या सगळ्यामध्ये रतीय स्वादाच्या मिठाईचाही सहभाग असणार आहे. तर या मेन्यूमध्ये बेकन आणि अंड्यांचाही समावेश असेल जी ट्रम्प यांची आवडती डिश आहे. Diet coke आणि cherry vanilla ice-cream ची सुद्धा व्यवस्था करण्यात आलीय. जेवणानंतर एमएफ हुसेन यांच्या पेंटिंगवाला अ‍ॅप्रन ट्रम्प यांना भेट दिला जाईल. खूप वर्षांपूर्वी एमएफ हुसेन यांनी जेवता जेवता इथं एक पेंटिंग काढलं होतं. आता प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तींना याच पेंटिंगच्या प्रिंटवाला अ‍ॅप्रन आठवणीसाठी दिला जातो. ट्रम्प यांच्याआधी डिशेज क्लिंटन, बुश पासून ते ओबामा यांच्यापर्यंत सगळ्या पाहुण्यांना हे अ‍ॅप्रन देण्यात आलं होतं. त्यांना ते खूप आवडलंही होतं. इथं लावलेले केवळ फोटोच नाही तर ओबामा यांच्या स्वाक्षरीवाला मेन्यूसुद्धा याची साक्ष देतो आहे. पुढच्या वेळी या मेन्यूमध्ये ट्रम्प मेन्यूसुद्धा दिसून आला तर आश्चर्य वाटणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात