बंगाल-आंध्रसोडून आजपासून संपूर्ण देशात विमानसेवा सुरू, वाचा प्रवासी कुठे होतील क्वारंटाईन

बंगाल-आंध्रसोडून आजपासून संपूर्ण देशात विमानसेवा सुरू, वाचा प्रवासी कुठे होतील क्वारंटाईन

नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने प्रवासी आणि एअरलाइन्सबाबत (Airlines) काही गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 25 मे: देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) तब्बल दोन महिन्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा देशातंर्गत (Domestic Flights)विमानसेवा सुरु झाली. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एआरपोर्टवरून पहाटे 4 वाजून 45 मिनिटांला पुण्याकडे पहिले विमान झेपावलं. हे विमान 7 वाजून 45 मिनिटांला अहमदाबादला पोहोचेल.

हेही वाचा.. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कोरोना बळावतोय, आतापर्यंत 1180 जवानांना संसर्ग

नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने प्रवासी आणि एअरलाइन्सबाबत (Airlines) काही गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्‍ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र आणि तमिळनाडू राज्य सरकारने देशातंर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर हरकत नोंदवली आहे.

विमानसेवेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्याशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय प्रवासात अडकलेले प्रवासी, वैद्यकीय आणीबाणी, विद्यार्थी आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठीच विमानसेवा सुरू करावी, असं मुख्यमंत्र्यांनी हरदीप पुरी यांच्याशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्र सरकारने मुंबई विमानतळावरून 25 विमानांच्या टेकऑफला आणि 25 विमानांच्या लॅण्डिंगला परवानगी दिली आहे. हळूहळू ही संख्या वाढवली जाईल, अशी माहिती मंत्री नबाव मलिक यांनी दिली आहे.

हेही वाचा...विशेष पॅकेजपेक्षा प्रभावी उपाययोजनांची गरज, उद्धव ठाकरेंनी धुडकावली भाजपची मागणी

विमानाने प्रवास करणाऱ्या 14 वर्षांच्या वरच्या प्रवाशांसाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याचसोबत तब्येतीच्या समस्या असणाऱ्या 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आणि गरोदर महिलांच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा आणि  जम्मू-काश्मीर अशा काही राज्यांनी प्रवाशांच्या क्वारंटाईनबाबत काही वेगळी नियमावली तयार केली आहे. काही राज्यांनी प्रवाशांना संस्थागत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही प्रवाशांनी होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

हेही वाचा...

राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO! जनरल वॉर्डमध्ये कोरोना मृतदेह पडून

First published: May 25, 2020, 7:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading