राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO! जनरल वॉर्डमध्ये कोरोना मृतदेह कित्येक तास पडून

राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO! जनरल वॉर्डमध्ये कोरोना मृतदेह कित्येक तास पडून

कोरोना मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 मे: मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता असाच एक पुन्हा एकादा समोर आला आहे. घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोरोना मृतदेह जनरल वॉर्डमध्ये कित्तेक तासांपासून पडून असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा.. मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

जनरल वॉर्डमध्ये मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह बेडवर पॉलिथिनमध्ये बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर शेजारच्या बेडवर कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसत आहे. तब्बल 10 ते 12 तासांपासून हा मृतदेह जनरल वॉर्डमध्ये पडून आहे. त्याचबरोबर याच वॉर्डमध्ये शेवटच्या बेडवर आणखी एक मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकही स्टाफही या मृतदेहांकडे अद्याप फिरकलेला नाही आहे. यामुळे इतर रुग्णांमध्ये भीती पसरली आहे. शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली जात आहे.

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी राजावाडी हॉस्पिटलमधील हा धक्कादायक व्हिडिओ #shamefull या हॅशटॅगने ट्वीट केला आहे. हे अमानुष कृत्य असून मुंबई महापालिकेने याबाबत दखल घेऊन हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला हवं, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारीच रूग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. संबंधित वॉर्डमध्ये चार मृतदेह असल्याचे व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसत होते. त्यानंतर महापालिकेने या प्रकाराची दखल घेत सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी केली होती. आता घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महापलिका आता काय कारवाई करते, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

First published: May 24, 2020, 3:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading