नवी दिल्ली, 24 मे : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 15 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएपीएफमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1180 पर्यंत पोहोचली आहे.
सुदैवाने जवानांमध्ये ठीक होण्याचे प्रमाण चांगले आहे. सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये आढळून आले आहेत. बीएसएफमध्ये आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
बीएसएफमध्ये 286 जवान झाले कोरोनामुक्त
रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत बीएसएफचे 286 जवान कोरोनामुक्त झाले आहेत. हा आकडा संक्रमित झालेल्यांच्या दुप्पट आहे. यामध्ये सीआरपीएफचे मुख्य चिकित्स अधिकारी आणि जवान यांना संसर्ग झाल्यानंतर सीआरपीएफचे मुख्यालय सील करण्यात आले आहे.
सीआरपीएफचे 359 जवान संक्रमित
सीआरपीएफमध्ये संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये 359 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामध्ये 220 कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सर्व एअरपोर्टवर तैनात सीआयएसएफमध्येही 184 जवानांना लागण झाली असून यातील 116 जणं बरे झाले आहेत.
देशातील वैद्यकीय सेवा देणाऱ्यांमध्येही कोरोना बळावत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मुंबई व पुण्यात कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंता वाढवणारा आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय काही लक्षण आढळल्यास तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जात आहे.
हे वाचा -उद्धव ठाकरे सरकारची केरळकडे मदतीची हाक; कोरोना रोखण्यासाठी केली ही विनंती
घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसांठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा