हिंगोली, 30 ऑक्टोबर : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीत फटाके फोडण्याचा एक आगळा-वेगळा आनंद लहान मुलांना असतो. मात्र, हे फटाके (firecrackers) फोडत असताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अन्यथा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. असाच एक प्रकार हिंगोलीतून समोर आला आहे. फटाके फोडताना एका 9 वर्षीय मुलाने आपला डोळा गमावला (9 year old lost eye due to firecracker) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील औंढा तालुक्यात ही घटना घडली आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव (Gojegaon Aundha Taluka) येथे 9 वर्षीय मुलगा फटाके फोडत होता. फटाके फोडत असताना तो फटाका फुटला आणि उडून थेट या चिमुकल्याच्या डोळ्याला लागला. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने 9 वर्षीय साईनाथ घुगे याच्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर साईनाथ याला उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पेटता फटाका डोळ्याला लागल्याने झालेल्या दुखापतीत साईनाथ याने डोळा गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाचा : लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही? दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळीत लहान मुलांना मजा-मस्ती करण्याची एक वेगळीच हौस असते. किल्ला बनवणे, फटाके फोडणे, फराळावर ताव मारणे अशा गोष्टीत लहान मुलांचा पूर्ण वेळ जात असतो. मात्र, फटाके फोडताना लहान मुलांनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे परिणाम किती भयंकर होतात त्याचं हे उदाहरण आता समोर आलं आहे. त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोठ-मोठे फटाके फोडण्यासाठी देऊ नका. तसेच लहान मुले फटाके फोडत असताना त्यांच्या पालकांनी, मोठ्यांनी लहान मुलांच्यासोबत असणे आवश्यक आहे. जेणेकरुन लहान मुलांसोबत कुठलीही दुर्दैवी घटना घडणार नाही. वाचा : धनत्रयोदशीला होणार सोनारांची चांदी! विक्रमी सोनं विक्री होण्याची शक्यता फटाके फोडताना काळजी घेणं आवश्यक गेल्यावर्षी कोरोनामुळे फटाके फोडण्याची संधी लहानग्यांना मिळाली नव्हती मात्र, यंदा फटाके फोडण्याची संधी मिळाल्याने लहान मुलांमध्ये एक वेगळाच आनंद पहायला मिळत आहे. पण, फटाके ज्वलनशील असल्याने ते फटाके फोडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे विविध घटना घडल्याचं ऐकायला, वाचायला मिळत असतात. पेटता फटाका उडून आग लागल्याच्याही अनेकदा घटना घडत असतात. अशा प्रकारे फटाक्यांमुळे कुणालाही दुखापत होण्याची किंवा आग लागण्याची घटना घडू नये यासाठी लहानग्यांनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरुन कुठलीही दुर्दैवी घटना घडणार नाही आणि दिवाळीचा सण सर्वचजण आनंदाने, उत्साहात साजरा करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.